बॉलिवूडची २०२१ हे वर्ष फारसे चांगले गेले नाही. कोरोना आणि त्यामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटगृह बंद होती. त्यामुळेच अनेक मोठ मोठे सिनेमे प्रदर्शनासाठी पुढे ढकलण्यात आले. चित्रपटगृह बंद असल्यामुळे प्रेक्षकांकडे ओटीटी शिवाय दुसरे कोणतेच मनोरंजनाचे साधन नव्हते. आधी बहुतकरून फक्त वेबसिरीजसाठी ओटीटीकडे पहिले जायचे. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनेक चांगले आणि मोठे सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आले. अगदी सलमान खान, अक्षय कुमार पासून विकी कौशल वरुण धवनपर्यंत अनेक कलाकारांचे सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित झाले. या सिनेमांनी मोठे यश आणि लोकप्रियता देखील मिळवली. चला तर जाणून घेऊया २०२१ वर्षात ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची यादी.
सरदार उधम सिंग :
विकी कौशल अभिनित सरदार उधम सिंग हा सिनेमा याच वर्षी ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना विकीचा दमदार आणि प्रभावी अभिनय पाहायला मिळाला या सिनेमाचे खूप कौतुक देखील झाले. सिनेमा प्रेक्षकांना तुफान आवडला.
कागज :
सतीश कौशिक दिग्दर्शित आणि पंकज त्रिपाठी अभिनित ‘कागज’ हा सिनेमा देखील खूप गाजला. एका जिवंत व्यक्तीला कागदपत्रांवर मृत घोषित करण्यात येते आणि त्यानंतर चालू होतो त्याचा जिवंत असण्याचा संघर्ष.
शेरशहा :
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी अभिनित हा सिनेमा एका खऱ्या कथेवर आधारित होता. या सिनेमाचे आणि सिद्धार्थ, कियाराच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले.
त्रिभंगा :
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सिरीजमध्ये काजोल, मिथिला पालकर आणि तन्वी आझमी मुख्य भूमिकेत होत्या. आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित असलेली ही सिरीज देखील खूप गाजली.
मिमी :
‘मला आई व्हायचे’ या मराठी सिनेमावर आधारित असलेल्या मिमी सिनेमात कृती सेनन आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाला देखील लोकांची पसंती मिळाली.
शेरनी :
विद्या बालनने या सिनेमातून दणक्यात ओटीटीवर पदार्पण केले. अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमात विद्याने एका फॉरेस्ट ऑफिसरची भूमिका साकारली होती.
रश्मी रॉकेट :
तापसी पन्नू अभिनित या सिनेमा देखील गाजला. यात तापसीने एका ऍथलिटची भूमिका साकारली होती. हा सिनेमा महिला खेळाडूच्या जेंडर टेस्टवर आधारित होता.
पगलाईट :
सान्या मल्होत्रा अभिनित या सिनेमाला समीक्षक आणि प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. सिनेमासोबतच एक उत्तम संदेश देखील दिला गेला होता.
धमाका :
कार्तिक आर्यन अभिनित या सिनेमाला प्रेक्षकांनी पसंतीची पोचपावती दिली. हा एक सस्पेन्स सिनेमा होता. जो शेवट्पर्यंत प्रेक्षकांना बांधून ठेवतो.
हेही वाचा :
मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच ऑडिशनमधील विजेत्या कलाकारांचा रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने २०२१ वर्षात त्याला मिळालेल्या यशासाठी मानले प्रेक्षकांचे आभार, म्हणाला…
शर्वरी वाघ आहे सनी कौशलसोबत रिलेशनशिपमध्ये? स्वतःच सांगितले त्यांच्या नात्याचे सत्य