बॉलिवूड अभिनेता इरफान खान याने चित्रपटसृष्टीत आपले विशेष नाव कमावले आहे. बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत त्याच्या अभिनयाची जादू सर्वत्र पसरली आहे. मागच्या वर्षी इरफान खानच्या मृत्यूने संपूर्ण चित्रपट जगतात शोककळा पसरली होती. एवढ्या मोठ्या दिग्गज कलाकाराला गमावल्याने सगळ्यांनाच खूप दुःख झाले होते. नुकतेच झालेल्या निर्माते गिल्ड ऑफ अमेरिका पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘इन मेमोरिअम’ श्रेणीमध्ये इरफान खान अभिनेत्याची आठवण काढली गेली होती. परंतु तिथे त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली. इरफान खानचे नाव Irrfan Khan ऐवजी Irrif kahn असे लिहिले होते.
हा सोहळा बुधवारी (२४ मार्च) व्हर्च्युअली आयोजित केला गेला होता. इरफान खानसोबत मिनारी स्टार Steven Yeun हे नाव देखील Steven Yuen असे लिहिले होते. एवढ्या मोठ्या पुरस्कार सोहळ्यात या चुका मोठ्या होत्या. या चुकांना कदाचितच दुर्लक्षित करू शकतात. पीजीए पुरस्कार सोहळ्यात या श्रेणीमध्ये इरफान खानसोबत कर्क डग्लस, चॅडविक बोसमॅन यांच्यासोबत हॉलिवूडमधील अनेक कलाकारांना श्रद्धांजली देण्यात आली.
मागच्या वर्षी 29 एप्रिल 2020 रोजी इरफानचा कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचे दुःख संपूर्ण जगाला आजही आहे. इरफान खानने ‘ज्युरासिक वर्ल्ड’, ‘ए मायटी हार्ट’, ‘लाइफ ऑफ पाय’, ‘पजल’ यांसारख्या अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक पात्राने सगळ्यांच्या मनात त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण केले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हॉलिवूडमधील ‘द सुसाईड स्क्वॉड’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीझ, जॉन सीनाचा जबरदस्त अंदाज
-‘खूप भारी दिसतेय’, हिना खानच्या समुद्रावरील ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची कमेंट
-हिना खानच्या हॉट अंदाजावर चाहत्यांसह सेलिब्रिटीही फिदा! कमेंट्स करत केले अभिनेत्रीचे कौतुक