Tuesday, July 9, 2024

Bigg Boss OTT: शोमध्ये पुन्हा फुटले वादाला तोंड, स्पर्धकांमध्ये जुंपली जोरदार भांडणं

‘बिग बॉस ओटीटी’च्या लेटेस्ट भागामध्ये मूस जट्टाना आणि दिव्या अग्रवाल यांच्यात जोरदार भांडणं झाली आहेत. ‘लेटर टास्क’नंतर त्यांच्या भांडणाला सुरूवात झाली. टास्कदरम्यान दिव्याने मूस आणि प्रतीकची रणनीती ऐकली आणि तिने खोलीत प्रवेश करताच त्यांनी त्याबद्दल बोलणे बंद केले. दिव्या तिचा मित्र निशांत भट्टला याबद्दल सतर्क करण्याचा प्रयत्न करते. परंतु निशांत तिला सांगतो की, ते कशाबद्दल बोलत आहेत हे त्याला माहित आहे.

परंतु, नंतर जेव्हा टास्क संपला आणि कुटुंबातील सर्व सदस्य विश्रांती घेताना दिसले. तेव्हा मूसने दिव्याला टोमणा मारला की, ती निशांत आणि तिच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मूस दिव्याला म्हणते की, ती नेहमीच प्रत्येकाला उकसवते आणि लोकांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करते. भांडणादरम्यान मूस म्हणाली की, निशांतने त्याला सांगितले होते की, दिव्या निशांतला तिच्या विरुद्ध खेळण्यास प्रवृत्त करत आहे. (In ‘Bigg Boss OTT’, the controversy erupted once again, with the contestants arguing)

दिव्या त्यावेळी स्वयंपाकघरात काम करत होती आणि मूसच्या आक्रमक आणि असभ्य वर्तनामुळे ती आश्चर्यचकित झाली. दिव्या मूसला शांत होण्यास सांगते आणि तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते. पण मूस तिचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि दिव्यासोबत गैरवर्तन करत राहिली. नंतर, दिव्या चिडते आणि मूसला ‘इनसिक्योर बिट**’ म्हणते आणि त्यानंतर त्यांच्यात भांडण होते. मूस दिव्याला म्हणते की, “तिचे घरात कोणतेही कनेक्शन नाही. तू प्रत्येक ठिकाणी जाऊन तोंड मारून येतेस.”

दिव्या देखील तिच्यावर भडकली आणि म्हणाली की, “जर तिने पुन्हा तिच्या चारित्र्याबद्दल काही बोलले, तर ती तिला चापट मारेल.” तेव्हाच निशांत दिव्याची बाजू घेताना दिसतो ज्यामुळे त्यांचे भांडणं होते. निशांत मूसला विचारतो की, “जर त्याने तिला विश्वासाने काही सांगितले, तर तिने ते भांडणात का बाहेर काढले?” तसेच तो दिव्याला न भांडणं करण्याचा आणि मध्ये न पडण्याचा सल्ला देतो. प्रतीक आणि नेहा मूसला पाठिंबा देतात आणि नेहा दिव्याच्या विरोधात काही गोष्टी देखील बोलते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ

-देशाबाहेरही व्यक्त केला जातोय सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा शोक; जॉन सीनाने वाहिली अभिनेत्याला श्रद्धांजली

-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…

हे देखील वाचा