कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार पुनीत राजकुमारचे शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. ते फक्त ४६ वर्षांचे होते. त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे त्याला बंगळुरू येथील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. माध्यमांच्या वृत्तांनुसार, वर्कआउट करत असताना पुनीत यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बॉलिवूड आणि टीव्हीमध्ये काम करणारे जवळपास सर्वच कलाकार त्यांच्या फिटनेसबाबत खूप सावध असतात. जिममध्ये जाण्यापासून ते त्यांच्या डायटची विशेष काळजी घेतात. एवढेच नाही, तर कलाकार वेळोवेळी डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घ्यायला विसरत नाहीत, पण अनेक वेळा मद्यपान, धुम्रपान, योग्यवेळी डायट न करणे, तसेच अधिक जिम आणि व्यायामामुळे अनेक कलाकारांना हृदयविकाराचा झटका आला आहे. बघूयात असे कोणते कलाकार आहेत, जे फिट असूनही किंवा अधिक व्यायामामुळे त्यांना हृदयविकाराचे झटके आले आहेत.
अबीर गोस्वामी :
अबीर गोस्वामी या अभिनेत्याला आपण ‘प्यार का दर्द है, मीठा-मीठा’, ‘कुसुम’ यांसारख्या मालिकांमध्ये बघितले होते. वयाच्या ३७ वर्षी २०१३ च्या मे महिन्यात त्यांना हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यात त्यांनी या जगाचा निरोप घ्यावा लागला. जेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यावेळी ते ट्रेडमिलवर धावत होते.
सिद्धार्थ शुक्ला :
२ ऑगस्ट रोजी बॉलिवूड आणि टेलिव्हिजन स्टार सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या ४० वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिद्धार्थ त्याच्या फिटनेसबाबत नेहमीच सावध असायचा. त्याने एकही दिवस जिममध्ये जाणे सोडले नाही. मात्र तरीही त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचे निधन झाल्यामुळे त्याचे चाहते खूप दुःखी झाले होते. त्याच्या जीवनात त्याने ‘बिग बॉस’ आणि ‘खतरो के खिलाडी’ सारखे शो जिंकले आहे आणि त्यासोबत त्याला अनेक अवॉर्ड देखील मिळाले होते.
राज कौशल :
अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते राज कौशल यांचे या वर्षी ३० जून २०२१ रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना रात्री अचानक छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचे वय फक्त ५० वर्ष होते.
इंदर कुमार :
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते इंदर कुमार यांनी वयाच्या ४४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. २८ जुलै २०१७ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. खरं तर, २०११ मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते हेलिकॉप्टरमधून थेट जमिनीवर पडले आणि इथूनच त्यांच्या जीवनात संकटे यायला सुरुवात झाली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-