Wednesday, July 3, 2024

‘केबीसी’मध्ये बिग बींनी विचारला नीना गुप्तांबद्दल प्रश्न; स्पर्धकाने उत्तर देत जिंकले ‘इतके’ लाख रुपये

सध्या सोनी टीव्हीवर ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा सुरू झाला आहे. या शोने अनेक लोकांना करोडपती आणि लखपती बनवले आहे. केबीसीच्या १३ व्या पर्वाचा पहिला भाग २३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता प्रसारित झाला. सर्वप्रथम झारखंड शाळेचे शिक्षक ज्ञान राज हॉटसीटवर बसले आणि ते ३ लाख २० हजार रुपये जिंकून घरी परतले. त्यांच्यानंतर नेहा बाटला या हॉट सीटवर बसल्या होत्या. नेहाला या एक पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी २ हजार रुपये जिंकले होते.

मंगळवारी (२४ ऑगस्ट) शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी नेहासह शो पुढे नेला. याच दरम्यान अमिताभ यांनी नीना गुप्ताचे कौतुकही केले. ते म्हणाले की, “या पुस्तकात त्यांनी आयुष्यातील सर्व क्षण मनापासून लिहिले आहेत. हे खूप सुंदर पुस्तक आहे.”

हा खेळ सुरू असताना अमिताभ नेहाला विचारतात की, “२०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या अभिनेत्री नीना गुप्ताच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?” या प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन नेहाने ६ लाख ४० हजार रुपये जिंकले. यानंतर नेहा १२.५० वाजता शो सोडून गेली. नीना गुप्तांच्या पुस्तकाचं नाव ‘सच कहूं तो’ असे आहे.

याच दरम्यान नेहा यांनी सांगितले होते की, त्यांना त्यांच्या सासऱ्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या इथे आल्या आहेत. त्या पैशासाठी नाही, तर सन्मानासाठी आल्या आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की, पशुवैद्यकीय डॉक्टरांना जो आदर दिला पाहिजे, तो लोकांकडून मिळत नाही. जेव्हा नेहा शोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या आत्मचरित्राबद्दल बोलत होत्या, तेव्हा अमिताभ म्हणतात की, आत्मचरित्र लिहिणे खूप कठीण आहे. (In ‘Kaun Banega Crorepati’, Neha Butla, who was sitting on the hot seat, became a millionaire)

नेहा यांच्यानंतर स्वाती श्रीलेखाला केबीसी १३ च्या हॉट सीटवर बसण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. स्वाती शाळेत शिक्षिका असून अमिताभ तिला मुंबईचे प्रसिद्ध समोसे खायला घालणार आहेत. त्याचबरोबर त्या अमिताभ यांना म्हणणात की, पहिल्यांदा तिच्या खात्यात लाखो रुपये येणार आहेत.

कोरोना महामारीमुळे शोमध्ये खूप काळजी घेतली जात आहे. त्यामुळे स्पर्धक आणि शोचे होस्ट यांच्यातील अंतर राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, पण या हंगामात येणाऱ्या स्पर्धकांना अमिताभ यांना मिठी मारता येणार नाही. याची सर्व स्पर्धकांना खंत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर

हे देखील वाचा