मागील वर्षीपासून संपूर्ण देशात कोरोनाचे सावट पसरले आहे. या महामारीच्या काळात अनेक लोकांना आपला जीव गमावावा लागला. त्याचबरोबर अनेक लोकांना आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागले. याच दरम्यान या अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा ‘देवदूत’ बनून समोर आला. सोनू सूदने निस्वार्थ भावनेने सर्व लोकांना मदत केली. परंतु हाच देवदूत सध्या संकटात अडकला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्याच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली.
परंतु आता हे आयकर सर्वेक्षण संपले आहे. आयकर पथक सलग दुसऱ्या दिवशी रात्री १२:३० च्या सुमारास सर्वेक्षण केल्यानंतर सोनू सूदच्या घरातून बाहेर पडले. गेल्या दोन दिवसांपासून आयकर अधिकारी सोनू सूदच्या घरात सर्वेक्षण करत होते. सोनू सूदच्या घरात सर्वेक्षणादरम्यान, आयकर अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, सोनू सूदचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.
सोनू सूदच्या घरातून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हातात काही बॅग देखील दिसल्या. मात्र, आयकर अधिकाऱ्यांना सोनू सूदच्या घरातून काही हाती लागले आहे की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. आयकर विभागाने सोनू सूदचे घर आणि कार्यालयांवर एक सर्वेक्षण केले होते. पहिल्या दिवशी २० तासांहून अधिक काळ सोनू सूदच्या मालकीच्या ६ ठिकाणी सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली. आतापर्यंत आयकर विभागाने या सर्वेक्षणात काय साध्य केले याची माहिती अजूनही अस्पष्ट आहे.
विशेष म्हणजे, कोव्हिड महामारीच्या काळात, सोनू सूदने गरजू लोकांची प्रचंड मदत केली. त्याचबरोबर प्रसारमाध्यमे आणि सामान्य लोकांची प्रशंसा जिंकली आहे. कोरोना महामारी दरम्यान, सोनू सूदने मोठ्या संख्येने स्थलांतरित मजुरांना आर्थिक मदत केली होती. अशा मजुरांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी, त्यांना जेवण, वाहने इत्यादींची व्यवस्था केली होती.
चलो नया रास्ता बनाएं…
किसी और के लिए ????????
— sonu sood (@SonuSood) September 14, 2021
सोनू सूद सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. मात्र, आयकर विभागाच्या या सर्वेक्षणावर त्याने कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही. आयकर सर्वेक्षणाच्या एक दिवस आधी सोनू सूदने आपल्या ट्विटरवर लिहिले होते की, “चला नवीन मार्ग बनवूया… दुसऱ्या कोणासाठी तरी.”
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने सोनू सूदला शालेय विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे ब्रँड ऍंम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. या नियुक्तीच्या काही दिवसांनंतरच हे आयकर सर्वेक्षण करण्यात आले.
सच्चाई के रास्ते पर लाखों मुश्किलें आती हैं, लेकिन जीत हमेशा सच्चाई की ही होती है। @SonuSood जी के साथ भारत के उन लाखों परिवारों की दुआएं हैं जिन्हें मुश्किल घड़ी में सोनू जी का साथ मिला था। https://t.co/qsAyYvzkQP
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 15, 2021
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “सत्याच्या मार्गावर लाखो अडचणी आहेत, पण विजय नेहमीच सत्याचाच होतो. सोनू सूदजी तुमच्यासोबत भारताच्या लाखो कुटुंबांच्या प्रार्थना आहेत, ज्यांना कठीण काळात सोनू जीचा पाठिंबा मिळाला.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स
-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन
-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…










