Saturday, July 6, 2024

स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या महान व्यक्तींवर आधारित ६ चित्रपट; पाहून अभिमानाने फुगेल तुमची छाती

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आपण टीव्हीवर एकापेक्षा एक देशभक्तीपर चित्रपट पाहिले असतील. हे चित्रपट पाहून प्रत्येक सामान्य माणसाची छाती अभिमानाने फुगते. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभक्ती पूर्ण असे ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘स्वदेश’, ‘रंग दे बसंती’, ‘लक्ष्य’, ‘बॉर्डर’, ‘एलओसी’, ‘द गाझी अटॅक’, ‘मिशन काश्मीर’, ‘नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉर्गेटन हिरो’, ‘टँगो चार्ली’, ‘मंगल पांडे’, ‘द लीजेंड ऑफ भगत सिंग’, ‘ओम केसरी’, ‘राजी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘चटगांव’, ‘शहीद’, ‘उपकार’ आणि वेब सीरीज ‘द फोर्गटन आर्मी’, असे अनेक चित्रपट आपल्याला स्वातंत्र्याचे महत्त्व समजून सांगतात.

परंतु कल्पना करा की, हा फक्त एक चित्रपट आहे आणि खऱ्या आयुष्यात नायकांनी देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी कसे बलिदान दिले असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांविषयी सांगणार आहोत, जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या खऱ्या नायकांवर बनले होते आणि ज्या भूमिकेसाठी कलाकारांनी जीवाचे रान केले आहे.

झाशी की राणी (१९५३)
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका कोणीही विसरू शकत नाही. राणी लक्ष्मीबाईंनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. अशा परिस्थितीत १९५३ साली दिग्दर्शक सोहराब मोदी यांनी ‘झाशी की राणी’ यामधील राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनातील सर्व प्रवास पडद्यावर दाखवले होते. अनेक दशकांनंतर, कंगना रणौतने ‘मणिकर्णिका’मधील राणी लक्ष्मीबाईचे पात्र पुनरुज्जीवित केले आहे. यासाठी तिला प्रेक्षकांचे प्रेम देखील मिळाले होते. स्वातंत्र्या दिनाच्या निमित्ताने हा चित्रपट कुटुंबासोबत पाहता येईल.

शहीद (१९६५)
शहीद भगत सिंगवर बनवलेला पहिला फीचर चित्रपट १९६५ साली ‘शहीद-ए-आझम भगत सिंग’ होता. त्या काळात भारत-पाकिस्तान युद्ध चालू होते. या चित्रपटात मनोज कुमार यांनी मुख्य भूमिका बजावली होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. यानंतर भगत सिंगवर अजून बरेच चित्रपट बनले, पण मनोज कुमारसारखे पात्र इतर कोणीही साकारू शकले नाही. अजय देवगण अभिनित भगत सिंगलाही प्रेक्षकांचे प्रेम मिळाले होते.

गांधी (१९८२)
या चित्रपटाचे खास गोष्ट म्हणजे महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित ‘गांधी’ हा चित्रपट परदेशी लोकांनी बनवला होता. खरं तर, एक परदेशी गांधीबद्दल इतका प्रेमळ होता की, त्याने त्यांच्यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला होता. परदेशी लोकांनीही चित्रपटातील मुख्य पात्र लिहिण्याची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली होती. पण चित्रपट बनवण्यात भारत सरकार आणि लोकांचेही महत्त्वाचे योगदान होते. या चित्रपटाला जगभरातून पसंती मिळाली होती. परिणामी, चित्रपटाला ऑस्करमध्ये ११ श्रेणींमध्ये नामांकित करण्यात आले होते. त्यापैकी ८ श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन आणि अभिनय यासह तो पुरस्कार जिंकला होता. याशिवाय या चित्रपटाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही जिंकले आहेत.

सरदार (१९९३)
अखंड भारताचे निर्माते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर आधारित ‘सरदार’ या चित्रपटात परेश रावल यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली होती. या चित्रपटात दाखवण्यात आले आहे की, स्वातंत्र्यानंतर सरदारजींनी देशाला कसे एकत्र केले. चित्रपटात अनेक मनोरंजक भाग देखील आहेत. हे पाहिल्यानंतर लोकांची झोपलेली देशभक्ती जागृत होईल.

नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हीरो (२००४)
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यात महत्वाची भूमिका बजावली आहे, पण फार कमी लोकांना ते आठवत आहे. २००४ मध्ये श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हीरो’ या चित्रपटाने लोकांची मने जिंकली आणि त्यांना नेताजींच्या पात्राची जाणीव करून दिली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असला, तरीही दोन श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्यात चित्रपट यशस्वी झाला होता.

मंगल पांडे: द रायझिंग (२००५)
आमिर खानच्या अभिनयाने ‘मंगल पांडे: द रायझिंग’ या चित्रपटात १८५७ साली ब्रिटिशांविरोधातील लढा दाखवण्यात आला आहे. मंगल पांडेवर बनलेला हा एकमेव चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष दाखवू शकला नाही. पण १८५७ च्या क्रांतीशी संबंधित माहितीसाठी हा चित्रपट पाहता येईल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिंदूर नसल्यामुळे शम्मी कपूर यांनी थेट भरली होती गीता बालींच्या भांगेत लिपस्टिक; खूपच रंजक आहे कहाणी

-अमिताभ बच्चनपासून ते कपिल शर्मापर्यंत ‘हे’ कलाकार आहेत डावखुरे; संपूर्ण जगावर सोडलीय आपली छाप

-‘हा’ दिग्गज अभिनेता नसता, तर बॉलिवूडला मिळाला नसता ‘कॉमेडीचा बादशाह’ जॉनी लिव्हर; वाचा त्यांचा रंजक प्रवास

हे देखील वाचा