Thursday, December 4, 2025
Home बॉलीवूड स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्याने शेअर केला बिग बींचा ‘असा’ फोटो; ते पाहून अभिनेत्यालाही द्यावी लागली प्रतिक्रिया

स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्याने शेअर केला बिग बींचा ‘असा’ फोटो; ते पाहून अभिनेत्यालाही द्यावी लागली प्रतिक्रिया

नव्वदच्या दशकापासून चित्रपटसृष्टीत अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अनेक कलाकार आहेत. पण चित्रपटसृष्टीत प्रचंड मेहनत घेऊन आज चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच छाप मारणाऱ्या महानायकाचे नाव आहे अमिताभ बच्चन. अलिकडेच अमिताभ बच्चन यांच्या चाहत्याने त्यांचा असा एक फोटो शेअर केला, ज्या फोटोला स्वत: अभिताभ बच्चन यांना उत्तर देणे भाग पडले आहे.

आपण आजपर्यत पाहत आलो आहोत, की अनेक चाहते आपल्या आवडत्या कलाकाराचे फोटो सोशल मीडियावर अकाऊंटवरुन अपलोड करत असतात. त्या फोटोवर अनेकदा चाहतेच टिंगल टवाळ्या करत बाॅलिवूड कलाकारांची खिल्ली उडवताना देखील दिसतात. काही चाहते आपल्या आवडत्या कलाकारांविषयी लिहीत असताना चुका करताना अनेकदा आढळून आले आहेत. पण या वेळी अमिताभच्या बच्चन यांच्या एक चाहत्यांने स्वातंत्र्य दिनाऐवजी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असे कॅप्शन देऊन त्यांचा फोटो शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन यांच्या चाहत्याने लिहीले की, “स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… माझे प्रिय गुरुवर्य @SrBachchan सर आणि #ABEF हा तिरंगा आमची शान आहे, अरमान तिरंगा आहे आणि आमचा गर्व तिरंगा आहे.” या चाहत्याने स्वातंत्र्यदिनाला प्रजासत्ताक दिन म्हटले असुन अमिताभ बच्चन यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिताभ बच्चन राष्ट्रीय ध्वजाला मानवंदन करताना दिसत आहेत.

 

या त्याच्या ट्वीटवर महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले “भाईसाहेब, हे चुकीचे आहे! १५ ऑगस्ट हा ‘स्वातंत्र्य दिन’ आहे. तुम्ही त्याला प्रजासत्ताक दिन लिहीले आहे. INDEPENDENCE DAY म्हणजे स्वातंत्र्य दिन असतो आणि REPUBLIC DAY म्हणजे प्रजासत्ताक दिन असतो.”

हे ट्वीट सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्वीटवर अनेक युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “जसा देशात गोंधळ सुरू आहे. तसाच तो ही गोंधळुन गेला आहे.” दुसऱ्या युजर लिहीले, “काहीच हरकत नाही सर, माणुस आहे चुका होतातच.” तसेच युजर्स फोटो शेअर करत आहेत आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शास्त्रीजींच्या सल्ल्यावरून मनोज कुमारांनी बनवला हिट चित्रपट, त्यातल्या ‘मेरे देश की धरती सोना उगले…’ गाण्याने तर गाजवला काळ

-ही आहे हॉलिवूडमधील सर्वाधिक श्रीमंत कलाकारमंडळी, संपत्तीचा आकडा पाहून तुम्हीही व्हाल दंग

-‘काश माझी मुलं त्यांना भेटू शकली असती…’ वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त रितेश झाला भावुक; मुलांसोबत वाहिली श्रद्धांजली

हे देखील वाचा