Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड जय हिंद! अभिनेता आकाश ठोसरच्या स्वातंत्र्यदिनी हटके शुभेच्छा; खाकी वर्दीतील फोटो केला शेअर

जय हिंद! अभिनेता आकाश ठोसरच्या स्वातंत्र्यदिनी हटके शुभेच्छा; खाकी वर्दीतील फोटो केला शेअर

देशभरात ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. त्यामुळे बॉलिवूड तसेच मराठी कलाकार पोस्ट शेअर करून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अशातच ‘सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोसरनेही एक पोस्ट शेअर करत या शुभ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

आकाशने स्वत:चा फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने खाकी वर्दीचा ड्रेस परिधान केला आहे. तो रेल्वेच्या दारात उभा राहिला आहे. तसेच तो एक हात वर करुन हसत असल्याचे दिसत आहे. आकाशने पोस्ट शेअर करताना लिहिले की, “७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद.”

आकाशच्या या पोस्टला अनेक चाहते इमोजी कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, “जय हिंद!” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “परशा आर्ची आली रे आर्ची.” त्याच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही करत आहेत.

‘सैराट’ या मराठी चित्रपटातून आकाश ठोसरने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘सैराट’मध्ये आकाशने साकारलेल्या परश्याच्या भूमिकेने तरुण पिढीला अगदी वेडे करुन सोडले आहे. या चित्रपटातील आर्ची-परश्याची जोडी आजही तितकीच प्रसिद्ध आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते. याच चित्रपटातून आकाशला भरगोस प्रसिद्धी मिळाली.

त्यांनतर आकाशने सन २०१७ मध्ये ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’ या चित्रपटात काम केले. तसेच पुढे दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या ‘१९६२- द वॉर इन द हिल्स’ या वेब सीरिजमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली. यात त्याने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये वतन वतन मेरे आबाद रहे तू’, गाण्यावर डान्स करत रिंकूने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; तुम्हीही पाहा

-स्वातंत्र्यदिनाचा उत्साह परदेशातही! अमेरिकन व्यक्तीने ‘चक दे इंडिया’ गाण्यावर केला भन्नाट डान्स

-स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्याने शेअर केला बिग बींचा ‘असा’ फोटो; ते पाहून अभिनेत्यालाही द्यावी लागली प्रतिक्रिया

हे देखील वाचा