Tuesday, October 14, 2025
Home साऊथ सिनेमा लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीने दिला जुळ्या मुलांना जन्म, श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशीच दिली चाहत्यांना गुड न्यूज

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीने दिला जुळ्या मुलांना जन्म, श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशीच दिली चाहत्यांना गुड न्यूज

नमिता वंकावाला (Namitha Vankawala) हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव असून तिने अनेक तमिळ-तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. नमिता राजकारणाच्या क्षेत्रातही योगदान देते आणि तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करते. नुकतीच तिने आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली असून अलीकडेच ती 2 मुलांची आई झाली आहे. नमिताने स्वतः श्रीकृष्णाच्या जयंतीनिमित्त ही आनंदाची बातमी दिली आहे.

अभिनेत्री नमिताने श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केला  आणि सांगितले की तिने 2 जुळ्या मुलांना जन्म दिला आहे आणि दोघेही मुलगे आहेत. व्हिडिओ शेअर करत ती पुढे म्हणाले की, ‘हरे कृष्णा! या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना आमची चांगली बातमी सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. की आम्ही जुळ्या मुलांचे पालक आहोत. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम सदैव त्याच्या पाठीशी राहील अशी आशा आहे.”

“आम्ही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, क्रोमपेट येथे त्यांच्या उत्कृष्ट आरोग्य सेवा आणि सेवांसाठी कृतज्ञ आहोत. माझ्या गरोदरपणात माझ्या मुलांना या जगात आणण्यासाठी मला मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. भुवनेश्वरी आणि त्यांच्या टीमची मी ऋणी आहे. डॉ. ईश्वर आणि डॉ. वेल्लू मुर्गन सुद्धा मला माझ्या नवीन मातृत्वात मदत करत आहेत. खूप खूप धन्यवाद आणि जन्माष्टमीच्या शुभेच्छा!”

 

आई होण्याआधी नमिताने आपल्या सोशल अकाऊंटवर बेबी बंप फोटोशूटचे फोटो शेअर केले होते, मात्र काही दिवसांनी तिने आई झाल्याची गोड बातमी दिल्याचे दिसते. अलीकडेच तिने फोटो शेअर करून ‘चांगली आई होण्यासाठी नम्र विद्यार्थी असणे आवश्यक आहे.’ अशी पोस्ट शेअर केली होती.  यावरून असे दिसून येते की अभिनेत्री आई होण्याचे गुण शिकत आहे आणि तिच्या मातृत्वाचा काळ आनंदाने उपभोगत आहे. नमिताने 2017 मध्ये मल्लीरेड्डी वीरेंद्र चौधरी यांच्याशी लग्न केले आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला होता.

हेही वाचा – व्हायरल व्हिडिओनंतर करणसिंग ग्रोवर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; म्हणाले, ‘तो बायकोच्या जिवावर जगतो…’

बाहुबलीचे लेखक काढणार ‘आरएसएस’वर वेबसिरीज; घोषणा करत म्हणाले, ‘RSS ने गांधींना…’

शिल्पा शेट्टीच्या मुलांचा ‘राधाकृष्ण’ लूक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

हे देखील वाचा