Thursday, July 31, 2025
Home बॉलीवूड अनिल कपूरने केला वायुसेनेचा अपमान, वायुसेनेने सुनावले खडे बोल, माफी मागून पण…

अनिल कपूरने केला वायुसेनेचा अपमान, वायुसेनेने सुनावले खडे बोल, माफी मागून पण…

अनिल कपूर आणि अनुराग कश्यप अभिनित ‘AK वर्सेस AK’ या नेटफ्लिक्सच्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर अनिल कपूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरून शेयर केला. ट्रेलर प्रदर्शित झाल्या झाल्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. याचे कारण ट्रेलर मधील काही सीन्स. या ट्रेलरच्या एका सीनमध्ये अनिल कपूर वायुदलाचा गणवेश घालून चुकीच्या भाषेचा वापर करताना दिसत आहे.

अनिल कपूरच्या या सीनवरुन भारतीय वायुदलाने आक्षेप घेतला आहे. भारतीय वायुदलाने या सिनेमाचा ट्रेलर रिट्विट करत सांगितले की, ” या सिनेमातील अनिल कपूर यांचा चुकीचा गणवेश आणि गणवेश घालून केलेल्या चुकीच्या भाषेच्या प्रयोगामुळे वायुदलाची प्रतिमा मालिन होऊ शकते. त्यामुळे त्यांनी त्वरीत हा सीन काढून टाकण्यास सांगितले आहे.”

आपल्या देशात मागील काही काळापासून डिफेन्सवर अनेक चित्रपट, वेबसिरीज आणि मालिका बनत आहे. मात्र निर्माते, दिग्दर्शक कलाकृती बनवत असताना देशाच्या डिफेन्सच्या तत्वांचा, नियमांचा सन्मान न करता पाहिजे तसे बदल ते करतात. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत चुकीच्या गोष्टी पोहचतात. याच चुकीच्या गोष्टींना आळा बसावा म्हणून ऑगस्ट २०२० मध्ये संरक्षण मंत्रालयाने सूचना आणि प्रसारण मंत्रालयाला एक पत्र लिहून सांगितले की, डिफेन्सवर आधारित कोणत्याही कलाकृतीला प्रदर्शनापूर्वी सर्वप्रथम संरक्षण मंत्रालयाकडून एन.ओ.सी.घ्यावी लागेल. जेणेकरून अशा चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचणार नाही. यापूर्वी एकटा कपूरच्या ‘ट्रिपल एक्स’ आणि ‘कोड एम’ या वेबसिरीजवरून देखील वाद निर्माण झाला होता. त्यामुळेच संरक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला.

याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी नुकतेच अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांचे ट्विटरवर शाब्दिक वाद सुरु होते. ते दोघं असे भांडत होते की पाहणाऱ्याला बघून वाटत होते जणू खरंचभांडतायत. मात्र तो एक प्रमोशनचा फंडा होता.

हे देखील वाचा