Friday, June 20, 2025
Home बॉलीवूड भारतीय सेनेने हटक्या स्टाईलने दिले ‘रियल हिरो’ असणाऱ्या सोनू सूदला ट्रिब्यूट

भारतीय सेनेने हटक्या स्टाईलने दिले ‘रियल हिरो’ असणाऱ्या सोनू सूदला ट्रिब्यूट

बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून सोनू सूदचे नाव घेतले जाते. सोनू जितका उत्तम अभिनेता आहे तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त तो एक उत्तम व्यक्ती आहे. सोनुने त्याच्या स्वतःच्या हिंमतीवर आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये स्वतःचे हटके आणि मजबूत स्थान निर्माण केले. सोनुने कोरोनाच्या काळात जे काही कार्य केले त्यासाठी संपूर्ण जगाने त्याचे कौतुक केले. आजही त्याच्या त्या कार्याबद्दल त्याची प्रसंशा केली जाते. विविध पद्धतीने जगाने त्याच्या कार्याचा सन्मान केला. यातच भारतीय सेनेने देखील त्याला खरा हिरो म्हणून सांगितले आहे.

भारतीय सेनेने हिमालयातील बर्फावर रियल हिरो सोनू सूद असे लिहिले आहे. हे फोटो सोनू सूदने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करताना सोनुने कॅप्शनमध्ये लिहिले, “हिमालयात कुठेतरी. या फोटोंनी माझा दिवस बनवला आहे. विनम्र, माझी प्रेरणा भारतीय सेना.” भारतीय सेनेने दिलेला हा खास ट्रिब्यूट पाहून सोनू भावनिक झाल्याचे देखील पाहायला मिळाले. भारतीय सेनेकडून असा सन्मान खूपच क्वचित पाहायला मिळतो. फोटो पाहून हे तर नक्की की भारतीय सैनिकांच्या मनात सोनूसाठी एक खास जागा आहे. भारतीय सेनेकडून याआधी देखील सोनूप्रती सन्मान दाखवण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

सोनू सूदसाठी दाखवला गेलेला हा सन्मान पाहून नेटकऱ्यांना देखील खूपच आनंद झाला आहे. त्याचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी देखील त्यावर कमेंट्स करत त्याचे आणि भारतीय सेनेचे कौतुक केले आहे. त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, सर्वांनाच ते आवडत आहे. अनेकांनी सांगितले की, राजकारणात येऊनच समाजसेवा होते असे नाही बाहेर राहून देखील समाजासाठी काही करता येते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरे बापरे! फराह खान होती करण जोहरच्या प्रेमात, तांत्रिक अडचण सांगत ‘त्याने’ नाकारला प्रस्ताव

पतीच्या ‘या’ गोष्टीला कंटाळलेली फराह खान लग्नाच्या एका वर्षातच जाणार होती पळून, वाचा रंजक किस्सा

हे देखील वाचा