Wednesday, July 3, 2024

‘इंडियन आयडल १२’च्या निकालात मोठा ट्विस्ट, घोषित होणार दोन विजेते?

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो इंडियन आयडल या शोचा रविवारी (१५ ऑगस्ट) रोजी होत आहे. हा शो दुपारी १२ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत चालू आहे. इंडियन आयडलच्या इतिहासात पहिल्यांदाच हा शो एवढ्या वेळ चालू आहे. त्यामुळे आज ‘इंडियन आयडल १२’चा विजेता मिळणार आहे. या शोमध्ये अनेक कलाकार देखील उपस्थित झाले आहेत. तसेच अनेक संगीतकारांची गाणी देखील ऐकायला मिळाली आहेत. स्पर्धकांनी देखील अप्रतिम परफॉर्मन्स दिले आहेत. पण या फिनालेमध्ये निर्माते एक ट्विस्ट आणणार आहेत.

इंडियन आयडलच्या फिनालेमध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार या शोचे निर्माते या वर्षी एक नाही तर दोन विजेते घोषित करणार आहेत. असं झालं तर रियॅलिटी शोच्या इतिहासात ही गोष्ट पहिल्यांदाच घडेल. निर्मात्यांच्या आधी या शोचे सर्वात लोकप्रिय स्पर्धक पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांनी एका मुलाखत या गोष्टीची हिंट दिली होती (indian ideol 12 finale makers are planning have two winners know the grand finale grand prize money know details)

‘इंडियन आयडल १२’ चे विजेते या बाबत जेव्हा मीडिया चॅनेलने अरुणिता आणि पवनदीप यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, “शोचे निर्माते दोन विजेते घोषित करण्याबद्दल विचार करत आहेत. पण खरंच असं झालं, तर हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.” परंतु याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

दोन विजेत्यांसोबत अजून या शोमध्ये काय ट्विस्ट येणार आहे. हे आज रात्री १२ वाजताच समजणार आहे. इंडियन आयडल ट्रॉफीसोबत विजेत्याला २५ लाख रुपयांचे बक्षीस देखील मिळणार आहे. तसेच माध्यमातील वृतानुसार विजेत्याला एका म्युझिक कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट देखील मिळणार आहे. तसेच लंडनमधील एक स्टेडियममध्ये कॉन्सर्ट परफॉर्म करायला मिळणार आहे.

इंडियन आयडल १२ मध्ये ६ स्पर्धकांमध्ये चांगलीच जुगलबंदी झाली आहे. उत्तराखंडमधून पवनदीप राजन, कोलकातामधून अरुणिता कांजीलाल, विजागमधील शन्मुखप्रिया, उत्तरखंडमधून दानिश खान, बंगलोरमधून निहाल आणि महाराष्ट्रामधून सायली कांबळे हे स्पर्धक आहेत. आता फक्त इंडियन आयडलची ट्रॉफी कोणाच्या हातात जाते हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये वतन वतन मेरे आबाद रहे तू’, गाण्यावर डान्स करत रिंकूने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; तुम्हीही पाहा

-स्वातंत्र्यदिनाचा उत्साह परदेशातही! अमेरिकन व्यक्तीने ‘चक दे इंडिया’ गाण्यावर केला भन्नाट डान्स

-स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्याने शेअर केला बिग बींचा ‘असा’ फोटो; ते पाहून अभिनेत्यालाही द्यावी लागली प्रतिक्रिया

हे देखील वाचा