Wednesday, July 3, 2024

आनंद गगनात मावेना! विजय देवरकोंडाकडून शन्मुखप्रियाला मिळाली चित्रपटात गाण्याची संधी; म्हणाला, ‘लवकर भेट…’

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो इंडियन आयडल या शोचा रविवारी (१५ ऑगस्ट) फिनाले झाला. हा शो दुपारी १२ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत चालू होता. ‘इंडियन आयडल’च्या इतिहासात पहिल्यांदाच हा शो एवढ्या वेळ चालू राहिला. त्यामुळे आज इंडियन आयडल १२ चा विजेता मिळाला. हा किताब पवनदीप राजनने आपल्या नावे केला. या शोमध्ये अनेक कलाकार देखील उपस्थित झाले होते. तसेच अनेक संगीतकारांची गाणी देखील ऐकायला मिळाली. स्पर्धकांनी देखील अप्रतिम परफॉर्मन्स दिले. अशातच या शोची स्पर्धक शन्मुखप्रिया हिने सहावा क्रमांक पटकावला. तत्पूर्वी तिच्यासाठी एक सरप्राईज मिळाले.

शन्मुखप्रियासाठी दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा याने एक व्हिडिओ मेसेज पाठवला होता. हे पाहून शन्मुखप्रिया खूपच खुश झाली. शन्मुखप्रिया ही विजय देवरकोंडा याची खूप मोठी फॅन आहे. तसेच विजय देवरकोंडाला देखील इंडियन आयडल हा शो आणि शोमधील स्पर्धक खूप आवडतात. हा खास मेसेज इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तो शन्मुखप्रियाला शुभेच्छा देत आहे. (indian ideol 12 grand finale vijay devarkonda offer song to shanmukhpriya in his next film)

या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, “आज इंडियन आयडल १२ चा ग्रँड फिनाले आहे. तुम्हा सर्वांना खूप प्रेम आणि आशीर्वाद. जर शन्मुखप्रियाची आई तिथे उपस्थित असेल, तर तिला माझा नमस्कार. जेव्हा केव्हा शन्मुखप्रिया स्टेजवर येते, तेव्हा ते गाणे तुम्ही देखील गुणगुणत असता. आज मला असे वाटते की, तुम्ही देखील शन्मुखप्रियासोबत स्टेजवर गाणे गावे. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच. फिनालेमध्ये हार जीत महत्वाची नाही, तर तेव्हा केवळ तुम्हाला तो क्षण जगता आला पाहिजे.”

यापुढे तो म्हणाला की, “आज फिनाले आहे. हार जीत या सगळ्या गोष्टी विसरून जा. फक्त मस्त धमाल करा. आज स्टेजला तुमचे बनवून टाका. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि शन्मुखप्रिया या सगळ्यानंतर तू हैद्राबादला येऊन मला भेटशील. तू माझ्या चित्रपटात गाणं गाणार आहे. ही डील झाली आहे.”

हे सगळं ऐकून शन्मुखप्रियाला खूपच आनंद झाला. हे सगळं पाहून तिला विश्वासच बसत नव्हता की, हे सगळं होत होते. तिच्यासाठी ही एकप्रकारे स्वप्नपूर्तीच ठरली. आता शन्मुखप्रियाला मिळालेल्या एवढ्या मोठ्या ऑफरमुळे तिचे चाहते खूपच खुश झाले आहेत. शन्मुखप्रिया ही इंडियन आयडलमधील एक स्ट्रॉंग स्पर्धक आहे. पण अनेकवेळा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. सगळ्यानंतर देखील तिने खूप मेहनत घेऊन तिचे स्थान मिळवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंडियन आयडल १२’च्या निकालात मोठा ट्विस्ट, घोषित होणार दोन विजेते?

-टीव्ही इतिहासात पहिल्यांदाच १२ तासांचा फिनाले प्रसारित, ‘इंडियन आयडल’च्या ६ शिलेदारांमध्ये टक्कर

-स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्याने शेअर केला बिग बींचा ‘असा’ फोटो; ते पाहून अभिनेत्यालाही द्यावी लागली प्रतिक्रिया

हे देखील वाचा