यावर्षी इंडियन आयडलचे १२ वे पर्व चांगलचे गाजले. तब्बल दहा महिने चालणाऱ्या या पर्वातील सर्व सहभागी स्पर्धक देखील खूप चर्चेत आले होते. फिनालेमध्ये पवनदीप राजनने इंडियन आयडॉलच्या ट्रॉफीवर स्वतःचे नाव कोरले. या शोमधून स्पर्धकांना त्यांची कला सादर करण्यास मिळाली. सोबत त्यांना भरपूर लोकप्रियता देखील मिळाली आहे. याचं शोमधील एक लोकप्रिय स्पर्धक म्हणजे शणमुखप्रिया. शोमध्ये शणमुखप्रिया खूप लोकप्रिय होती. सोशल मीडियावर बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला. परंतु तिने या सगळ्यावर मात करून ग्रँड फिनालेमध्ये तिची जागा निर्माण केली होती.
या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये शणमुखप्रियाला एक खास आणि अविस्मरणीय सरप्राईज मिळाले होते. ते म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा याने तिला खास मेसेज पाठवला होता. त्याने तिला तिच्या या इंडियन आयडलच्या प्रवासासाठी आणि निकालासाठी शुभेच्छा दिल्या होत्या आणि सोबतच त्याने तिला त्याच्या पुढच्या चित्रपटात गाणे गाण्याची ऑफर देखील दिली होती. तसेच तिला आणि तिच्या आईला भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. आता विजयने त्याचे वचन पळाले आहे. सोबतच शण्मुखप्रियाचे विजय देवरकोंडाला भेटण्याचे स्वप्नसुद्धा पूर्ण झाले आहे. (Indian ideol contestant shanmukh Priya sing a song for sauthstar vijay devarkonda’s film)
विजय देवरकोंडाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ शणमुखप्रिया विजयला भेटायला त्याच्या घरी गेलेली आहे. तसेच तिच्यासोबत तिची आई देखील आहे. विजय देवरकोंडाला पाहून ती खूप खुश होते आणि त्याला मिठी मारते. तसेच तो तिला सांगत असतो की, मी तुझे व्हिडिओ पाहिले आहेत, गाणी ऐकली आहे. तू खूप छान गाते. तसेच त्याने तिला गाण्याची ऑफर दिलेली ती देखील पूर्ण होताना दिसत आहे. ती त्याच्या पुढच्या चित्रपटात गाणे गाणार आहे.
हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले आहे की, “एखाद्या व्यक्तीचे स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो.” तसेच शणमुखप्रियाने देखील हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
इंडियन आयडलचा ग्रँड फिनाले या वर्षी तब्बल १२ तास चालला आहे. प्रेक्षकांनी देखील या पर्वाला चांगला प्रतिसाद दिला होता.