Wednesday, July 3, 2024

‘इंडियन आयडल १२’मध्ये आदित्य नारायणने उडवली किशोर कुमार यांच्या मुलाची थट्टा! कुमार सानू यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आणि रियॅलिटी शो होस्ट आदित्य नारायण बर्‍याचदा चर्चेत असतो. आजकाल आदित्य ‘इंडियन आयडल १२’ या प्रसिद्ध रियॅलिटी शोला होस्ट करत आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाच्या एका विशेष भागात ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तथापि हा भाग प्रेक्षकांना अजिबात आवडला नाही. कार्यक्रमात खास पाहुणे म्हणून आलेला किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार, यांनीही या मालिकेवर टीका केली आहे. आता होस्ट आदित्य नारायणने या वादावर टिंगल उडवली आहे.

‘इंडियन आयडल १२’ च्या नवीन एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये होस्ट आदित्य नारायण अमित कुमार यांच्या बोलण्याची थट्टा करताना दिसत आहे. या आठवड्यात कुमार सानू, अनुराधा पौडवाल आणि रूप कुमार राठोड इंडियन आयडलच्या मंचावर पाहुणे म्हणून येणार आहेत.

निर्मात्यांनी अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तिन्ही पाहुणे शोच्या स्पर्धकांचे कौतुक करताच आदित्य नारायण कुमार सानू आणि इतरांना प्रश्न विचारतो. आदित्य म्हणतो, “मी हा प्रश्न सानू दा, रूपकुमार राठोड आणि अनुराधा जी यांना विचारू इच्छितो की, तुम्ही स्पर्धकांची मनापासून प्रशंसा करत आहेत का आमच्या टीममधील एखाद्याने तुम्हाला असे करण्यास सांगितले आहे?”

हा प्रश्न ऐकल्यावर कुमार सानू म्हणतात, “हा योग्य प्रश्न आहे. हे कन्फर्मेशन आहे जेणेकरून यापुढे असे काहीही होणार नाही. आम्ही अगदी मनापासून स्पर्धकांचे कौतुक केले आहे. हे आश्चर्यकारक गायक आहेत. हे नऊ पैकी नऊ हिरे आहेत. मी जे काही कौतुक केले ते मनापासून केले.”

गायन रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’बद्दल सर्वात मोठा वाद तेव्हा झाला होता, जेव्हा किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी निर्मात्यांचा पर्दाफाश केला होता. ते म्हणाले होते, “हो मला माहित आहे की प्रेक्षकांनी या एपिसोडबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खरं म्हणजे किशोर कुमारांसारखे कोणीही गाऊ शकत नाही. त्याचे व्यक्तिमत्त्व डोंगराइतके उंच होते. आजच्या तरुण पिढीला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. त्यांना फक्त ‘रूप तेरा मस्ताना’ आणि ‘आराधना’ बद्दल माहिती आहे.”

त्यानंतर आदित्य नारायणने लगेचच अमित कुमार यांच्या विधानावर आपले मत मांडले होते. आदित्य म्हणाला होता, “अमितजींनी बर्‍याच प्रसंगी आमच्या शो, स्पर्धक आणि टीमचे कौतुक केले आहे. तसेच, तिथे त्यांनी आम्हाला किशोर दाशी संबंधित अनेक वैयक्तिक कथा व किस्से सांगितले होते. जर ते शोमधील कोणत्या गोष्टीवर नाराज होते, तर त्यांनी शूटिंगच्या वेळी ते बोलायला पाहिजे होते.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक

-प्रसिद्ध गायिकेला करावा लागला होता लैंगिक शोषणाचा सामना, वयाच्या १९ व्या वर्षी होती गरोदर

-क्या बात है! मिथुन चक्रवर्ती यांचा ‘डिस्को डान्सर’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; दिवाळीच्या आसपास होणार रिलीझ

हे देखील वाचा