टीव्हीवरील सर्वात चर्चेत असलेला ‘इंडियन आयडल १२’ हा सिंगिंग रियॅलिटी शो चांगलाच चर्चेत आहे. शोमधील स्पर्धकांना जितके प्रेम मिळत आहे, त्यापेक्षा अधिक हा शो यावेळी वादात अडकला आहे. कधी शोच्या निर्मात्यांना, तर कधी परीक्षकांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. केवळ इतकेच नाही, तर यावेळी स्पर्धकांनाही ट्रोल करण्यात आले आहे. शोवर असा आरोपही लावण्यात आला आहे की, प्रशंसा करण्यासाठी पैसे दिले जातात. मात्र, आता या शोचे निर्माते एक वेगळाच ट्विस्ट घेऊन आले आहेत. यामुळे प्रेक्षकही हैराण झाले आहेत. निर्मात्यांनी शोच्या मध्येच स्पर्धकांना त्यांच्या घरी पाठवले आहे. तसं तर यापूर्वी कधीच स्पर्धकांना घरी पाठवले नाही, पण यावेळी निर्मात्यांनी हे पाऊल उचलले आहे. आता यामागील कारणही आपण जाणून घेणार आहोत. (Indian Idol 12 Makers Sent Contestants Pawandeep Rajan Arunita Kanjilal Home Know The Reason)
‘इंडियन आयडल १२’च्या निर्मात्यांचा मोठा निर्णय
या शोमध्ये पवनदीप राजनव्यतिरिक्त अरुणिता कांजिलाल, मोहम्मद दानिश, शनमुखप्रिया, सायली कांबळे आणि आशिष कुलकर्णी आहेत. सर्व स्पर्धकांमध्ये जबरदस्त टक्कर पाहायला मिळत आहे. अशामध्ये निर्मात्यांनी सर्व स्पर्धकांना आपापल्या घरी पाठवले आहे आणि त्यांना प्रेक्षकांकडून वोट म्हणजेच मतदान करण्याची विनंती करण्यास सांगितले आहे.
खरं तर निर्मात्यांनी निश्चित केले आहे की, सर्व गायक आपल्या घरी जाऊन जवळपासच्या स्थानिक लोकांना मतदान करण्याची विनंती करावी. सोबतच सोशल मीडियावरही त्यांनी आपापले व्हिडिओ बनवून पोस्ट करावे. शोचा फिनाले लवकरच येणार आहे. अशामध्ये तोच जिंकेल, ज्याला सर्वाधिक मते मिळतील.
या शोमधील सर्वांचा आवडता स्पर्धक पवनदीपचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पवनदीप आपल्या घरी उत्तराखंडमध्ये पोहोचला आहे. तिथे त्याने उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना एक गाणेही ऐकवले. त्याच्या आसपास काही लोक दिसत आहेत. पवनदीप जेव्हा परफॉर्मन्स करत असतो, तेव्हा लोक त्याचा व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. लोकांना त्याचे गाणेही आवडत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बापरे बाप! ‘द कपिल शर्मा शो’साठी कपिलने केली मानधनात वाढ? एका आठवड्यासाठी घेणार ‘इतके’ कोटी