Wednesday, July 3, 2024

आपल्या आवाजाच्या‌ जोरावर ‘इंडियन आयडल १२’चे विजेतेपद पटकावणाऱ्या पवनदीप राजनबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत‌ का?

मागच्या दहा महिन्यांपासून इंडियन आयडल १२ चा सुरु असणारा सुरेल प्रवास अखेर काल (१५ ऑगस्ट) एका सुखद वळणावर येऊन थांबला. नुकत्याच संपन्न झालेल्या इंडियन आयडलच्या अंतिम भागात उत्तराखंडच्या पवनदीप राजनने बाजी मारत इंडियन आयडल १२ च्या चकाकत्या ट्रॉफीवर स्वतःचे नाव कोरले. दहा महिन्यांनी इंडियन आयडलचा विजेता कोण होणार, या सर्वांच्या चर्चांवर पूर्णविराम लागत, पवनदीप राजनच्या नावाची विनर म्हणून घोषणा करण्यात आली. सहा स्पर्धकांमध्ये रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात पवनदीपने बाजी मारली आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे नक्की पवनदीप.

पवनदीप राजन हा मूळचा उत्तराखंडच्या कुमाऊं गावातील रहिवासी आहे. त्याला लहानपणापासूनच संगीताचा वारसा घरातच मिळाला. पवनदीपचे वडील आणि काका यांनी त्याला बालपणापासून संगीताची शिक्षा दिली. त्याचे आजोबा आणि आजी त्यांच्या काळातील प्रसिद्ध लोककलावंत होते. पवनदीप हा इंडियन आयडल १२ या पर्वातील एकमेव असा स्पर्धक होता, ज्याला जवळपास सर्वच वाद्ये वाजवता येतात. तो वाद्ये वाजवण्यासोबतच गायनातही निपुण आहे. इंडियन आयडल १२ मध्ये येण्यापूर्वी पवनदीपने २०१५ साली ‘द व्हॉइस’ हा शो त्याने जिंकला होता. अगदी पहिल्या दिवसापासून पवनदीप हा शो जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार समजला जात होता. (know who is pawandeep rajan)

पवनदीप राजनची बहीण ज्योतिदीप राजन देखील एक गायिका आहे. पवनदीपबद्दल बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असेच काहीसे झाले. कारण लहान असल्यापासूनच त्याचा संगीताकडे ओढा जरा जास्तच होता. अगदी कमी वयातच त्याने तबला वाजवायला सुरुवात केली. त्याची तबला वाजवण्यातील निपुणता पाहून त्याच्या वडिलांनी त्याला तबला वाजवण्यासाठी पाठिंबा दिला. आज पवनदीप पियानो, ढोलक, ड्रम, कीबोर्ड, गिटार आदी अनेक वाद्ये वाजवतो.

२०१५ साली ‘द व्हॉइस’ जिंकल्यानंतर त्याच्या संगीताच्या प्रवासाची सुरुवात झाली. पवनदीप एक उत्तम गायकासोबतच, म्युझिक कंपोजर आणि म्युझिक दिग्दर्शक देखील आहे. प्राप्त माहितीनुसार त्याने मराठी आणि पहाडी चित्रपटांना संगीत दिले आहे. त्याने आतापर्यंत देश-विदेशात अनेक म्युझिक शो केले आहेत.

पवनदीप या शोमध्ये आला आणि त्याच्या आवाजाने त्याने शो संपण्याच्या आधीच मोठी फॅन फॉलोविंग तयार केली. या पर्वातील तो पहिला असा स्पर्धक आहे, ज्याला १ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. पवनदीप एका बँडचा देखील सदस्य असून त्याने आतापर्यंत १३ देशांमध्ये आणि भारतातील १४ राज्यांमध्ये १२०० पेक्षा अधिक शो केले आहेत. त्याची एक वेबसाईट देखील असून तिचे नाव pawandeeprajan.com असे आहे.

पवनदीप राजन विजेता ठरला असून अरुणिता कांजीलाल दुसऱ्या स्थानावर राहिली. तिसऱ्या क्रमांकावर सायली कांबळे, चौथ्या क्रमांकावर मोहम्मद दानिश, पाचव्या क्रमांकावर निहाल, सहाव्या क्रमांकावर शनमुखाप्रिया ठरले. स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने ‘इंडियन आयडल ११’चा फिनाले पार पडला. यंदाचा फिनाले तब्बल १२ तास चालला. या १२ तासात अनेक पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘या’ कारणांमुळे नक्कीच पाहा अजय देवगणचा वायूदलाचे शौर्य सांगणारा ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’

परिणीती चोप्राला प्रचंड आवडतो सैफ अली खान; म्हणाली, ‘…मी लगेच हो म्हणू शकते’

बॉलिवूडमधील असे कलाकार ज्यांना लाभलीय लष्करी पार्श्वभूमी; सुष्मितापासून ते प्रियांकापर्यंत ‘यांचा’ आहे समावेश

हे देखील वाचा