Friday, November 22, 2024
Home अन्य भारताच्या पहिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या भानू अथैया यांचे निधन

भारताच्या पहिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या भानू अथैया यांचे निधन

भारताच्या पहिल्या ऑस्कर विजेत्या भानू अथैयाने यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. प्रसिद्ध भारतीय वेशभूषाकार (कॉस्ट्यूम डिजाइनर) भानु अथैया यांनी भारतासाठी पहिला अकादमी व ऑस्कर पुरस्कार जिंकला. १९५६ मध्ये वेशभूषाकार म्हणून त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात बॉलिवूड अभिनेता गुरुदत्त यांच्या सीआयडी चित्रपटाद्वारे केली होती.

माध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांच्या मुलीने माहिती दिली की त्या बर्‍याच दिवसांपासून आजारी होत्या आणि मागच्या गुरुवारी त्यांचे निधन झाले. गेली तीन वर्षे त्या अंथरुणाला खिळून होत्या. त्यांच्या निधनाबद्दल माहिती देताना भानु अथैया यांची मुलगी राधिका म्हणाली, “त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला. आठ वर्षापूर्वी त्यांना मेंदूत ट्यूमर असल्याचे निदान झाले होते. गेली तीन वर्षे ती अंथरुणावर होती, कारण त्यांच्या शरीराचा एक भाग अर्धांगवायू (पॅरालाईझ) झाला होता. “दक्षिण मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांचे अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर देखील त्यांच्या निधनाबद्दल अनेक चाहते आणि चित्रपट श्रुष्टीतील लोक  श्रद्धांजली वाहात आहेत.

भानु अथैया यांनी गुरु दत्त, यश चोप्रा, बी आर चोप्रा, राज कपूर, विजय आनंद, राज खोसला आणि आशुतोष गोवारीकर यांच्यासह अनेक जणांसोबत वेषभूषाकार म्हणून काम केले आहे. रिचर्ड एटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटासाठी भानु अथैया यांना सर्वोत्कृष्ट पोशाखसाठी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी १०० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये वेशभूषाकार म्हणून काम केले. आमीर खानच्या ‘लगान’ आणि शाहरुख खानच्या ‘स्वदेस’ हे त्यांनी वेशभूषाकार म्हणून काम पाहिलेले शेवटचे चित्रपट.

२०१२ मध्ये त्यांनी ऑस्कर पुरस्कार परतण्याची घोषणा केली होते. यावेळी त्या म्हणाल्या की त्यांचे कुटुंब आणि भारत सरकार हा अमूल्य पुरस्कार राखण्यात अक्षम आहेत. अशा परिस्थितीत हा पुरस्कार अकादमीच्याच संग्रहालयात सुरक्षित असेल.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा