Friday, April 26, 2024

बॉलीवूडच्या ‘या’ सिनेमाने तोडले होते सगळे रेकॉर्ड्स, तब्बल ७१ गाण्यांसहित बनला होता चित्रपट

भारतीय चित्रपट सुपरहिट होण्यासाठी चित्रपटातील गाणी खूप महत्वाची ठरतात. संगीतामुळे चित्रपटाला मजबुती प्राप्त होते. संगीत ही ती कला आहे ज्यामुळे आपले उदास मन देखील प्रफुल्लित होत असते. आज या संगीताबद्दल आम्ही जी माहिती देणार आहे, ती ऐकून कदाचित तुम्ही हैराण व्हाल. एखाद्या चित्रपटात जास्तीक जास्त किती गाणी असू शकतात. एक दोन, तीन जास्तीत जास्त 10. हा एक आपला साधारण अंदाज असतो. पण बॉलिवूडमध्ये एक चित्रपट असा होता ज्यामध्ये तब्बल 71 गाणी होती. चला तर जाणून घेऊया त्या चित्रपटाबद्दल ज्यात 71 गाणी होती.

एकूण 71 गाणी असलेल्या या चित्रपटाचे रेकॉर्ड आजपर्यंत कोणीच मोडू शकले नाही. 1932 मध्ये ‘इंद्रसभा’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात 71 गाणी होती. या गाण्याबद्दल जाणून घेण्याआधी आपण त्या काळातील चित्रपटांबद्दल जाणून घेऊया. ही गोष्ट तर सर्वांनाच माहित आहे की, 1913 मध्ये आलेला ‘राजा हरिशचंद्र’ हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला चित्रपट होता. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे ‘दादा साहेब फाळके’ हे या चित्रपटाचे निर्माते होते.

1913 पासून 1934 पर्यंत भारतात जवळपास 1200 मूक चित्रपट झाले आहेत. परंतु त्यातील काहीच चित्रपट आहेत हे प्रेक्षक यूट्यूब आणि स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. मूक चित्रपटानंतर 1931 मध्ये पहिला टॉकी चित्रपट निर्माण झाला. या चित्रपटाचे नाव ‘आलम आरा’ हे होते. तमिळ आणि तेलुगू यामध्ये देखील याच वर्षी टॉकी चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात झाली.

सुरुवातीच्या काळात भारतीय चित्रपटामध्ये संगीताला खूप महत्व होते. चित्रपट जास्त मनोरंजक बनवण्यासाठी चित्रपटात गाणी असणे खूप महत्वाचे होते. ‘आलम आरा’ या चित्रपटात एकूण सात गाणी होती. या नंतर भारतीय चित्रपट सृष्टीला एक असा चित्रपट मिळाला ज्याने सर्वांना हैराण केले होते. तो चित्रपट म्हणजे इंद्रसभा. या चित्रपटात एकूण 71 गाणी होती. ‘जे.जे. मदन’ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट हसन अमानत यांनी लिहिलेल्या एका उर्दू नाटकावर आधारित होता. नगरदास यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते.

या चित्रपटात ठुमरी, गजल, गाणी, चौबलासारख्या अनेक गाण्यांचा समावेश होता. हे सगळे मिळून चित्रपटात एकूण 71 गाणी होती. सरकारने नोकरी मिळवताना घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न नेहमीच विचारला जातो की, तो कोणता चित्रपट आहे ज्यात सर्वात जास्त गाणी होती.

या चित्रपटानंतर हळूहळू चित्रपटातील गाण्यांची संख्या कमी होऊ लागली. 1943 मध्ये ‘शकुंतला’ नावाचा चित्रपट आला होता, या चित्रपटात 42 गाणी होती. 90 चे दशक येईपर्यंत या गाण्यांची संख्या कमी होत होत 12 ते 14 गाणी एवढी झाली. 1994 मध्ये आलेला ‘हम आप के है कौन’ या चित्रपटात देखील खूप गाणी होती. या चित्रपटात एकूण 14 गाणी होती. या प्रमाणेच ‘सिलसिला’, ‘मोहब्बते’, ‘ताल’ या चित्रपटात देखील 10 पेक्षा अधिक गाणी होती.

हे देखील वाचा