Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड घर पाहावे बांधून! सोनम कपूरचे राजधानी दिल्लीतील ‘इतक्या’ कोटींचे अलिशान घर पाहिलंय का?

घर पाहावे बांधून! सोनम कपूरचे राजधानी दिल्लीतील ‘इतक्या’ कोटींचे अलिशान घर पाहिलंय का?

बॉलिवूडची फॅशन डिवा म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूर सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोनम तिच्या चाहत्यांसाठी बरेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी सोनमने पती आनंद आहूजासोबत दिल्लीत एक आलिशान घर विकत घेतले आहे.

लॉकडाऊन दरम्यान हे दोघेही त्यांच्या दिल्लीच्या घरात क्वारंटाईन झाले होते. त्यावेळी सोनमने सोशल मीडियावर तिच्या घराचे अनेक फोटो शेअर केले होते. काही फोटोंद्वारे तुम्हाला समजेल की, सोनम कपूर कोणत्या घरात राहते आणि ते घर कसे दिसते. चला पाहूया तिच्या सुंदर घराच्या आतले फोटो!

सोनम कपूरने देशाची राजधानी दिल्लीत जे नवीन घर घेतले आहे, त्याची किंमत सुमारे 173 कोटी रुपये आहे. तुमच्यातील बर्‍याच जणांना त्या दोघांचा एक फोटो आठवत असेल. जेव्हा कोरोना लॉकडाउनच्या वेळी दोघेही घरात क्वारंटीन होते. त्या काळात तिने तिच्या या घराचे शानदार फोटो शेअर केले होते. यात सोनमच्या बेडरूमचाही एक फोटो आहे, ज्यामध्ये ती पती आनंदसह बेडवर बसलेली दिसत आहे.

याशिवाय सोनम कपूरने तिच्या लिव्हिंग रूम, किचन, स्टडी रूम आणि गार्डनचे फोटोही शेअर केले होते. फोटोंमध्ये आनंद आहूजा कधी योगा करताना, तर कधी संगणकावर काम करताना दिसत आहे. तर सोनमही स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना दिसत आहे. सोशल मीडियावर सोनम कपूरने शेअर केलेले हे सर्व फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

इतकेच नाही, तर हे घर राहण्याव्यतिरिक्त फोटोशूटसाठीही उपयुक्त आहे. चांगले बॅकग्राऊंड असल्यामुळे जबरदस्त फोटो क्लिक केले जातात. पती आनंदही तिच्या फोटोंमध्ये बर्‍याच वेळा दिसला आहे. सोनमने 8 मे 2018 रोजी आनंद आहूजाशी लग्न केले होते. लग्नाच्या वेळी कोरोनाचा इतका उद्रेक झालेला नव्हता. त्यामुळे लग्नाच्या कार्यक्रमात बी-टाऊनमधील अनेक लोक आले होते.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर या दिवसात सोनमने ‘ब्लाइंड’ चित्रपटाचे शूटिंग सुरु केले आहे. या चित्रपटात ती एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे, जी पाहण्यास असमर्थ म्हणजेच आंधळी आहे. हा चित्रपट ‘ब्लाइंड’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक असल्याचे सांगितले जात आहे. सोनमच्या या चित्रपटात विनय पाठक, लिलेट दुबे आणि पूरब कोहली यांच्यासारखे कलाकार दिसणार आहेत. सोनम अखेर ‘संजू’ चित्रपटात रणबीर कपूरच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसली होती.

हे देखील वाचा