सामाजिक भान असणारी आणि सोशल मीडियाला आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व देणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. तापसी हिचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वावर असतो. तसेच अनेक सामाजिक प्रश्नांवरही ती अनेकवेळा तिचे मत मांडताना दिसली आहे. तापसी पन्नूचे चाहते तिच्या आगामी ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात तिचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तिच्या व्यतिरिक्त अभिनेता हर्षवर्धन राणे आणि विक्रांत मैसी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची कहाणी एका लव्ह ट्रँगलवर आधारित असणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तापसी पन्नू एक इंटिमेट सीन देताना दिसली आहे. त्यामुळे तिचा हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता. (Interesting disclosure of tapasee pannu about intimate seen of haseen dillruba film)
तापसीने या चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल खुलासा केला आहे. जो ऐकून कोणीही हैराण होईल. तापसीने तिच्या एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे की, “या इंटिमेट सीन आधी हर्षवर्धन आणि विक्रांत खूप घाबरलेले होते. ते नक्कीच हा विचार करून घाबरले असतील की, काय माहित आता ही काय करेल आपल्यासोबत.”
या मुलाखतीत ती तिच्या इमेजबाबत खूप चिंतेत असल्याचे दिसून आले. तिने सांगितले की, “माहीत नाही त्या दोघांच्या मनात माझ्याबाबत काय इमेज तयार झाली असेल. मी दिग्दर्शकाकडे त्यांची तक्रार देखील केली होती.”
तापसी पन्नू तिचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला वेगळे ठेवते. जेव्हा तिला विचारले की, चित्रपटात इंटिमेट सीन्सबाबत ती तिच्या पार्टनरला सांगते का? यावर तिने उत्तर दिले की, “मी माझ्या पार्टनरला या सगळ्या गोष्टी सांगत नाही. मी माझे व्यावसायिक आयुष्य वेगळे ठेवते.”
परंतु विक्रांत मैसचे अगदी याच्या उलट आहे. त्याने सांगितले की, त्याची पार्टनर आधी चित्रपटाचे स्क्रिप्ट बघते. जेणेकरून तिला या चित्रपटातील सगळ्या सीनबद्दल माहिती मिळेल. हर्षवर्धनच्या बाबत अनुभव खूप नॉर्मल आहे. त्याने सांगितले की, त्याला अनेक वेळा असे सीन आले आहेत.
‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट 2 जुलैला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तापसी पन्नू यासोबतच ‘लक्ष्मी रॉकेट’, ‘दोबारा’, ‘लूप लपेटा’ आणि ‘शाबास मिट्टी’ या चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नादच खुळा! श्रीदेवीची लाडकी लेक बनलीय ‘लालपरी’, फोटोवर बहीण सोनमसह इतर मैत्रिणींच्या हटके कमेंट्स
–एका फोटोत केले चक्रासन, तर दुसऱ्यात पडलीय बेडवर; पाहा दीपिकाचे ‘एक्सपेक्टेशन वर्सेस रियॅलिटी’










