Friday, March 29, 2024

ऋषी कपूरांनी तब्बल २० अभिनेत्रींसोबत केली होती करिअरची सुरुवात, वाचा

बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक गोष्टी घडतात. कधी पडद्यावर, तर कधी पडद्याच्या मागे. यापैकी सर्वच गोष्टी प्रेक्षकांना समजतात असं नसतं बरं का मंडळी. मात्र, त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. आज या लेखातून आपण बॉलिवूडमधील माहीत नसलेल्या फॅक्ट्सबद्दल जाणून घेणार आहोत.

आख्खं बॉलिवूड गाजवणारे बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन यांनी नव्वदपर्यंत आपल्या अभिनयाने अक्षरश: धुमाकूळ घातला. ते एकमेव असे बॉलिवूड सुपरस्टार होते, जे १९९० पर्यंत कोटी किंवा त्यापेक्षा अधिक फी घ्यायचे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत आतापर्यंत एक- दोन नाही, तर तब्बल २० अभिनेत्रींनी करिअरची सुरुवात केली होती.

बॉलिवूडचा किंग खान अभिनयात आपलं नशीब आजमावण्यापूर्वी दिल्लीच्या दरियागंज येथे रेस्टॉरंट चालवायचा.

रेखा जेव्हाही कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमात जातात, तेव्हा त्या फक्त आणि फक्त डार्क रेड किंवा चॉकलेटी रंगाची लिपस्टिक लावतात.

जर तुम्ही ब्लॉकबस्टर ‘शोले’ सिनेमा पाहिला असेल, तर तुम्हाला त्यातील ‘कितने आदमी थे’ हा डायलॉग नक्कीच आठवेल. हा डायलॉग ओके होण्यासाठी तब्बल ४० रिटेक घ्यावे लागले होते. झालात ना हैराण. थांबा थांबा. पुढं तर आणखी बरंच काही आहे.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी एका तमिळ सिनेमात रजनीकांत यांच्या आईची भूमिका साकारली होती. त्या जेव्हा रजनीकांत यांच्या आई बनल्या होत्या, तेव्हा त्यांचं वय हे फक्त आणि फक्त १३ वर्षे इतकंच होतं.

बेबो म्हणून ओळखळी जाणारी अभिनेत्री करीना कपूरने ‘हिरोईन’ या सिनेमात जेवढे कॉस्च्युम बदलले, तेवढे तर आख्ख्या बॉलिवूडमध्ये कोणत्या कलाकाराने बदलले नाहीत. यामध्ये करीनाने जे ड्रेस घातले, त्यातील काहींची किंमत ही जवळपास १.५ कोटी इतकी होती. डिरेक्टर मधुर भांडारकरने तिच्यासाठी १३० कॉस्च्युम बनवले, जे जगभरातील टॉपच्या डिझायनर्सने बनवले होते.

‘डीडीएलजे’ म्हणजेच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे’ या सिनेमातील सर्वात पहिलं रेकॉर्ड झालेलं गाणं म्हणजे, ‘मेरे ख्वाबो में जो आए’ हे होतं. आनंद बक्षी यांनी २४ वेळा हे गाणे लिहिले होते. पण नेहमी आदित्य चोप्रा हे गाणे रिजेक्ट करायचे.

बॉलिवूडचा हँडसम हंक म्हणून ओळखला जाणारा ऋतिक रोशनचा पहिला सिनेमा तर सर्वांनाच माहिती असेल. नाही का… त्याचा पहिला सिनेमा होता ‘कहो ना प्यार है.’ या सिनेमाने आतापर्यंत सर्वाधिक पुरस्कार जिंकले आहेत. बॉलिवूडमध्ये असा एकही सिनेमा बनला नाही, ज्याला ९२ अवॉर्ड मिळाले असतील.

तो ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खानच होता, ज्याने बॉलिवूडला १०० आणि २०० कोटी रुपयांच्या सिनेमांची ओळख करून दिली होती. त्याच्या २००८ साली रिलीझ झालेल्या ‘गजिनी’ या सिनेमाने पहिल्यांदा १०० कोटी रुपयांची कमाई केली होती.

सुपरहिट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे’ या सिनेमासाठी आदित्य चोप्रांची पहिली पसंती ही सैफ अली खानला होती. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण राज या रोलसाठी हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझच्या नावाचाही विचार केला गेला होता.

तुम्हाला माहिती आहे का? की, नॉर्थ अमेरिकेच्या टोटल फिल्म बिझनेसचा २५ टक्के भाग हा बॉलिवूड सिनेमांतून येतो.

‘चोली के पीछे क्या है’ हे गाणे गाण्यासाठी इला अरुण आणि अलका याज्ञिक यांना दोघींनाही अवॉर्ड मिळाला होता. बॉलिवूड इतिहासात कधीच कोणत्याही महिला गायिकांनी कधीही अवॉर्ड शेअर केलेला नाही.

सिनेमाचं तिकीट विकत घेण्याच्या बाबतीत भारतीय संपूर्ण जगात अव्वल क्रमांकावर आहे. भारतीय दरवर्षी २.७ अब्ज तिकीटे विकत घेतात. मात्र, भारतात सिनेेमांची तिकीटे सर्वात कमी आहेत.

अमिताभ बच्चन हे एवढे वक्तशीर होते की, ते अनेकदा वॉचमनच्याही आधी स्टुडिओमध्ये शूटिंगसाठी पोहोचायचे.

बॉलिवूड गाजवणाऱ्या अनिल कपूरचे कुटुंब मुंबईत आल्यानंतर ‘शो मॅन’ राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहिलं होतं. त्यानंतर अनिलचे कुटुंब मुंबईतील एका चाळीत एक खोली भाड्याने घेऊन राहायला गेले होते.

‘शोले’ सिनेमाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये खरोखरची बंदूक चालवण्यात आली होती. ज्यातून अमिताभ थोडक्यात बचावले होते.

हेही पाहा- रेखाच्या लिपस्टिकपासून ते करीनाच्या ड्रेसपर्यंत बॉलिवूडचे फॅक्ट्स 

‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ हे बॉलिवूडचं सर्वाधिक लांब गाणं आहे. या गाण्याची लांबी ही २० मिनिटे असून ते सिनेमात ३ भागात दाखवण्यात आले आहे.

आमिर खानचा ‘लगान’ हा सिनेमा चीनमध्ये रिलीझ होणार पहिला बॉलिवूड सिनेमा होता. याचा प्रीमिअर बीजिंग आणि शांघाईमध्ये करण्यात आला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा