Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड ‘नृत्याने अंधार आणि वेदनाविरुद्ध लढण्यास मिळते मदत’, म्हणत अभिनेत्री संदीपा धरने नृत्य दिनानिमित्त केला आयुष्यातील मोठा खुलासा

‘नृत्याने अंधार आणि वेदनाविरुद्ध लढण्यास मिळते मदत’, म्हणत अभिनेत्री संदीपा धरने नृत्य दिनानिमित्त केला आयुष्यातील मोठा खुलासा

आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या निमित्ताने गुरुवारी (२९ एप्रिल) अभिनेत्री संदीपा धरने तिच्या आयुष्याशी संबंधित सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. असे म्हणतात की, आयुष्यात काही चांगले चालू नसेल, तर डान्स देखील आपल्याला आशेचा एक किरण देतो. होय, संदीपाच्या बाबतीतही असेच काहीसे घडले, जेव्हा डान्स आणि संगीताच्या माध्यमातून तिला वेदना, चिंता, भीती, असुरक्षितता आणि अंधाराविरुद्ध लढण्याचे धैर्य प्राप्त झाले. खरं तर संदीपाने स्वतः सोशल मीडियावर याबाबद्दल खुलासा केला आहे.

संदीपाने इंस्टाग्रामवर लिहिले की, “या दिवसानिमित्त मी अंधार, वेदना, चिंता, भीती आणि असुरक्षिततेविरुद्ध लढायला मदत करणाऱ्या संगीत आणि नृत्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.”

एवढेच नाही, तर या नृत्य दिनी अभिनेत्री संदीपाने पुढे लिहिले की, “आयुष्य खूपच लहान आहे आणि आपण आपला बराचसा वेळ छोट्या छोट्या वस्तू जमवण्यासाठी घाम गाळतो. काळजी करणे, तक्रार करणे, एखाद्या मोठ्या गोष्टीची प्रतीक्षा करण्यापेक्षा चांगले आहे आशीर्वाद घेणे, जे आपल्या आजूबाजूला असतात. आयुष्य इतके नाजूक आहे की, सर्वकाही क्षणात बदलते. म्हणूनच मी ठरविले की, मला माझ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे. डान्सने मला शिकवले की जीवनातून नकारात्मक गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत.”

विशेष म्हणजे, संदीपाने जाझ, कंटेम्पररी, भरतनाट्यम या सारख्या नृत्य प्रकारात प्रभुत्व मिळवले आहे. बर्‍याचदा ती तिच्या डान्सचे अप्रतिम व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. संदीपाने ऑस्ट्रेलियन अकॅडमीद्वारे डान्समध्ये स्कॉलरशिप मिळवली आहे. याव्यतिरिक्त जगभरात शंभरहून अधिक कार्यक्रमांसह आंतरराष्ट्रीय ब्रॉडवे संगीताचेही नेतृत्वही संदीपाने केले आहे.

संदीपा धरने तिच्या कारकीर्दीची सुरूवात २०१० मध्ये, राजश्री प्रॉडक्शनच्या ‘इसी लाईफ में’ या चित्रपटापासून केली होती. संदीपासोबत अशोक ओबेरॉय या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. यानंतर ती सलमान खान अभिनित ‘दबंग 2’ या चित्रपटात दिसली. टायगर श्रॉफचा पदार्पण चित्रपट ‘हीरोपंती’ मध्येही संदीपाने काम केले आहे. यात तिने क्रिती सेननच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

आजकाल अभिनेत्री ‘बिसात’ या सीरिजसाठी चर्चेत आहे. या व्यतिरिक्त ती लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या ‘छत्तीस और मैना’ या शोमध्ये दिसणार आहे. अलीकडेच संदीपाने या शोच्या पहिल्या पोस्टरचा लूकही शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रेमो डिसूजाने पत्नी लिजेलसोबत केला मजेशीर व्हिडिओ शूट, पाहून तुम्हीही खदखदून हसाल

-खरंच! आयुष्यातील पहिली किस म्हणत रणबीर कपूरने घेतले होते माधुरी दीक्षितचे नाव, सांगितले कधी आणि कसे

-याला म्हणतात गाण्याची जादू! हिमेश रेशमियाच्या ‘या’ गाण्यामुळे सापडला होता खरा चोर, दोन रात्रीत उडवले होते एक लाख रुपये

-प्रियांका चोप्राला या अवतारात पाहून चाहते झाले हैराण, फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा