सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. एखादा व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडला, तर ते त्याला डोक्यावर घेतात. त्यामुळे त्या व्हिडिओतील व्यक्ती इंटरनेट सेन्सेशन बनते. त्या व्यक्तीचीच चर्चा सुरू असते. अशीच एक मुलगी आहे, जिला सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळाली. ती म्हणजे अंजली अरोरा. अंजलीची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते. नुकतेच ती एका एमएमएस व्हिडिओमुळे जोरदार चर्चेत आली होती. मात्र, आता तिचा नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तिने स्वत: शेअर केला आहे.
अंजली अरोरा (Anjali Arora) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओला जोरदार पसंती मिळत आहे. या व्हिडिओत ती चालताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचे ‘तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है…’ हे गाणे वाजत आहे.
View this post on Instagram
व्हिडिओतील अंदाज पाहून चाहते फिदा
व्हिडिओत अंजलीच्या अंदाजाला हे गाणे शोभत आहे. तिने या गाण्यात पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि रिप्ड जीन्स परिधान केली आहे. यामध्ये ती खूपच बिनधास्त दिसत आहे. तिने केस मोकळे सोडले आहेत. तिची चालण्याची पद्धत आणि डोळ्यांचे इशारे तसेच घायाळ करणारे हसू पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.
अंजलीच्या या व्हिडिओला २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, ५ हजारांहून अधिक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. ‘कच्चा बदाम’ फेम अभिनेत्री अंजली ‘लॉक अप’ शोमध्ये झळकली होती. यादरम्यान तिने धक्कादायक खुलासे केले होते.
एमएमएस व्हिडिओमुळे चर्चेत
अंजली नुकतीच एमएमएस व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. मात्र, तिने यावर नाराजी व्यक्त केली होती की, त्या व्हिडिओत ती नसून तिच्यासारखी दिसणारी व्यक्ती आहे. ती म्हणाली होती की, “जेव्हा कोणी बरोबरी करू शकत नाही, तेव्हा बदनामी सुरू करतात. मला याने काहीच फरक पडत नाही.”
विशेष म्हणजे, यासोबतच तिने अशा लोकांविरुद्ध सर्वांसमोर अपशब्दांचा वापर केला होता. आता अंजली तिच्या या व्हिडिओमुळे वाहवा लुटताना दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कोट्यवधी रुपयात खेळणाऱ्या आलियाला पहिल्या सिनेमासाठी करण जोहरने दिलेले फक्त ‘एवढे’ लाख, अभिनेत्रीचा खुलासा
लिपस्टिकला हात लावल्यामुळे भडकली हिना, शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीला जोरात वाजवली कानाखाली
बापरे! कॉमेडियन भारती सिंगने सर्वांसमोर केले दाक्षिणात्य अभिनेत्याला किस, व्हिडिओ तुफान व्हायरल