Friday, July 5, 2024

आहा कडकच ना! पिवळ्या रंगाची साडी नेसून उर्फी जावेदने केले चाहत्यांना घायाळ, फोटोवर इमोजींचाचा पाऊस

इंटरनेट सेन्सेशन बनलेली ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आहे. उर्फीने ज्याप्रकारे बिग बॉसच्या घरात धमाल केली होती, त्याचप्रकारे आता ती सोशल मीडियावर धमाल करताना दिसत आहे. तिने आपल्या ड्रेसिंग स्टाईलने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेकदा ती आपल्या विचित्र फॅशनमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. मात्र, तिला कोणाचीही पर्वा नाही. ती नेहमी आपले हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच आता उर्फीने जे फोटो शेअर केले आहेत, त्याने सर्वांची बोलती बंद होऊ शकते. कारण, या फोटोत उर्फीचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे.

उर्फीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच मनमोहक आणि सुंदर दिसत आहे. यामध्ये तिचा पारंपारिक लूक पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये दिसते की, तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. या साडीसोबत तिने डीप ब्लाऊजही परिधान केला आहे. तिच्या साडीच्या पदराची स्टाईल चाहत्यांना भावली आहे. चाहते तर तिच्या या लूकवर अक्षरश: फिदाच झाले आहेत. (Internet Sensation Urfi Javed Latest Photoshoot In Saree Actress Traditional Look Photos Goes Viral)

तिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये गाण्याचे बोल लिहिले आहेत. तिने कॅप्शनमध्ये “‘टिप टिप बरसा पानी, पानी ने…,” असे लिहिले आहे. तिच्या या फोटोंना आतापर्यंत ६० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच १ हजारांपेक्षाही अधिक युजर्सने कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

एका युजरने कमेंट करत तिला “क्रीमी डॉल,” असे म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “हॉटनेस ओव्हरलोड.” याव्यतिरिक्त इतर युजर्स फायर आणि लव्ह इमोजींचा वर्षाव करताना दिसत आहेत.

अलीकडेच उर्फीने तिचे काही हॉट फोटो शेअर केले होते, ज्यात ती ऍनिमल प्रिंट ब्रा आणि स्कर्टमध्ये दिसली होती. तसेच, तिने स्वतःचा एक हॉट व्हिडिओही शेअर केला होता, ज्यामध्ये उर्फीने स्किन कलर टॉप आणि स्कर्ट घातला आहे. व्हिडिओमध्ये, उर्फी प्रथम तिचा टॉप आणि स्कर्ट हाताळताना तिची सडपातळ कंबर दाखवते, नंतर तिचे कानातले दाखवते. यानंतर, उर्फी समोरून कॅट वॉक करते आणि तिची हॉट फिगर दाखवते.

उर्फीचा सोशल मीडियावरील वावर प्रचंड असून तिला इंस्टाग्रामवर तब्बल १.८ मिलियन म्हणजेच १८ लाख युजर्स फॉलो करतात. त्यामुळे तिची कोणतीही पोस्ट शेअर करताच व्हायरल होताना दिसते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘असे’ केल्यास प्रियांका चोप्राला बसू शकतो पती निकचा मार, स्वतः केला खुलासा

-बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पूर्ण केलेल्या रणबीर कपूरने नाकारले होते ‘हे’ सहा सुपरहिट सिनेमे

-नोरा फतेहीचे ‘कुसु कुसु’ गाणे प्रदर्शित, डान्स मूव्ह्जने चुकवला रसिकांच्या काळजाचा ठोका

हे देखील वाचा