दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या जीवनात आनंद निर्माण झालाय. दिपिकाने ८ सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. आपल्या मुलीच्या जन्मानंतर रणवीर-दीपिका आनंदात आहेत. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण दीपिका-रणवीरला त्यांच्या मुलीच्या जन्माबद्दल शुभेच्छा देत आहेत.
दीपिकाच्या बाळाच्या जन्मामुळे एन्टरटेन्मेंट क्वीन राखी सावंत खूपच खूश आहे. ती दुबईमध्ये त्यांच्या मुलीसाठी खरेदी करत आहे. राखीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती दीपिका-रणवीरच्या मुलीसाठी खेळणी खरेदी करताना दिसत आहे.
राखीने तिच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून आनंद व्यक्त केला आहे. व्हिडिओमध्ये राखीचा उत्साह पाहून चाहतेही खूश आहेत. तिचा आनंद पाहून चाहते तीचे कौतुक करत आहेत.
दरम्यान राखीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये राखी म्हणते- ‘अरे रणवीर सिंग, दीपिका मी आंटी झाली आहे. दीपिका आणि मी, आम्ही एकत्र डान्स क्लासेस केले, आमच्या करिअरची सुरुवात एकत्र केली. तू मोठी स्टार झालीस, तू बायको झालीस. आता तू आई देखील झाली आहे. त्यानंतर राखी खेळण्यांच्या दुकानात बाहुलीकडे जाते आणि दुबईतील मॉलमधून बेबी कॅरियर, स्ट्रॉलर आणि बेबी ब्लँकेट खरेदी करताना दिसते. काळ्या कार्गो पँटसह फिटेड ॲनिमल प्रिंट स्कूप नेक टी-शर्ट घालून, आपल्या सोनेरी कुरळे केसांसह राखी खूपच स्टाइलिश दिसते आहे.
राखी सावंतच्या पोस्टवर चाहते खूप कमेंट करत आहेत. एकाने लिहिले – राखी सावंतचे हृदय खूप चांगले आहे, ती सर्वांचे भले करण्याचा विचार करत असते, परंतु या गरीब मुलीला कोणीही समजून घेत नाही. दुसऱ्याने लिहिले – तिचे मन स्वच्छ आहे, ती सर्वांसाठी आनंदी आहे.
दीपिका-रणवीरच्या मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते आता वाट पाहत आहेत. त्यांना हे जाणून घ्यायचे आहे की मुलगी तिच्या वडिलांवर गेली आहे की आईवर गेली आहे
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
सनम तेरी कसमचा दुसरा भाग बनणार; हर्षवर्धन राणे सोबत निर्मात्यांनी केली अधिकृत घोषणा…