Wednesday, December 4, 2024
Home अन्य सुश्मिता सेनचे मित्र आणि आयपीएलचे संस्थापक ललित मोदी ऑक्सिजन सपोर्टवर

सुश्मिता सेनचे मित्र आणि आयपीएलचे संस्थापक ललित मोदी ऑक्सिजन सपोर्टवर

इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) माजी अध्यक्ष ललित मोदी मागील काही महिन्यांपूर्वी सुश्मिता सेन्सोब्त असलेल्या त्यांच्या नात्यामुळे मोठ्या प्रमाणावर लाईमलाइटमध्ये आले होते. ललित मोदी आणि सुष्मिता सेन सोबत वर्ल्ड टूरवर गेल्यानंतर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये ललित मोदी यांनी सुष्मिताला त्याची बेटर हाफ असे म्हटले आणि कला, क्रीडा विश्वात एकच धमाका झाला. सगळ्यांनाच त्यांच्या नात्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. तेव्हापासून ललित मोदी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले.

आता पुन्हा एकदा ललित मोदी लाइमलाईट्मधे आले आहे. मागील काही दिवसांपासून ते ऑक्सिजनवर असून, त्यांना इन्फ्लूएंजा, निमोनिया यासोबतच एकाच आठवड्यात दोनदा कोरोना झाला आहे. मेक्सिको मध्ये राहत असलेल्या मोदी यांना त्यांच्या मुलाने आणि डॉक्टरांनी एयरलिफ्ट करत लंडनमध्ये नेले आणि आता त्यांच्यावर तिथे उपचार चालू आहेत. या सर्व गोष्टींची माहिती खुद्द ललित मोदी यांनीच सोशल मीडियावरून दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

ललित मोदी यांनी एक पोस्ट आणि सोबतच त्यांचा एक फोटो शेअर करत लिहिले, ” मी मेक्सिकोमध्ये होतो, आणि तिथे आजारी पडलो. आता मला एअर ऍम्बुलन्सने लंडनला आणण्यात आले आहे. शेवटी दोन डॉक्टर आणि सुपर कुशल मुलासह एअर ऍम्बुलन्सने लंडनला पोहोचलो. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केले. दुर्दैवाने मी अजूनही २४ तास ऑक्सिजनवर आहे.” त्यांनी पुढे लिहिले, “दोन डॉक्टरनी माझी खूप काळजी घेतली. माझ्यावर उपचार केले. एकाने मेक्सिकोमध्ये माझी काळजी घेतली तर दुसऱ्याने लंडनमध्ये. त्याच्या कौतुकाची माझ्याकडे शब्द नाही. विमान आरामदायक होते विस्तारा जेटला धन्यवाद. मी सर्वांचे माझ्या मित्रपरिवाराचे देखील आभार मानतो.” त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्यात सुश्मिता सेनेचा भाऊ असलेल्या राजीव सेनने देखील कमेंट करत लिहिले, “ललित, तुम्ही लवकर बरे व्हावे, यासाठी शुभेच्छा, स्ट्राँग राहा,”

 

View this post on Instagram

 

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

आयपीएलची सुरुवात ललित मोदी यांनी केली. २००५ ते २०१० पर्यंत बीसीसीआयचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर २००८ तर २०१० ते आयपीएलचे अध्यक्ष आणि कमिशनर होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘वाळवीतल्या वाळवीने सुद्धा आपलं काम…’, म्हणत हेमंत ढोमेने केली ‘वाळवी’ सिनेमावर पोस्ट
शाहरुख खानचा ‘पठाण’ गाठणावर उंची, दिसणार जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा