Tuesday, February 3, 2026
Home बॉलीवूड सुवर्णसंधी! सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आमिर खानच्या मुलीने दिली इंटर्नशिपची संधी, पगारही केला जाहीर

सुवर्णसंधी! सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आमिर खानच्या मुलीने दिली इंटर्नशिपची संधी, पगारही केला जाहीर

बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानची मुलगी इरा खान आजकाल खूपच चर्चेत आहे. साराची एक पोस्ट सोशल मीडियावर खूपच वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. इरा खान लोकांना मानसिक संतुलनाविषयी जागरूक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच कामासाठी इराला आणखी काही लोकांची गरज आहे. तिने या कामासाठी काही जागा काढल्या आहेत. एवढंच नाही तर तिने पगार देखील ठरवला आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

इरा खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला पोस्ट केले आहे की, “मानसिक संतुलनसाठी मला लोकांची गरज आहे. इच्छुक असलेल्या 25 जणांची गरज आहे. ही इंटर्नशिप 1 महिन्याची असणार आहे. यासाठी 5 हजार रुपये पगार देखील दिला जाणार आहे. इंटर्नचे काम लोकांना कॉल करायचे आणि ई-मेलद्वारे त्यांना माहिती द्यायची असणार आहे. तुमची शिफ्ट 8 तासाची असेल, 22 मार्चपासून हे काम सुरू केले जाईल. वेगवेगळ्या राज्यातील लोकांची गरज आहे जेणे करून, वेगवेगळी भाषा बोलणाऱ्या व्यक्ती ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतात.”

इरा खान मानसिक संतुलनाविषयी मोकळेपणाने बोलते आणि त्याबाबत सगळ्यांना जागरूक देखील करते. ती स्वतः देखील डिप्रेशन मधून गेली आहे. मागच्या वर्षी ‘मेंटल हेल्थ डे’च्या दिवशी तिने या गोष्टीचा खुलासा केला होता.

इराने मागच्याच वर्षी जिम ट्रेनर नुपूर शिखरे सोबतच्या तिच्या नात्याचा खुलासा केला आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिला अभिनयामध्ये जास्त रस नाहीये. तिने 2019 मध्ये दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्वा! प्रियंका सिंग- नीलम गिरीचे नवीन गाणे रिलीझ, काही तासातच मिळाले ४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-अभिनयाचे बादशाह! बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज कलाकारांनी केला होता सरकारी नोकरी सोडून चित्रपटसृष्टीत प्रवेश

-वयाच्या सहाव्या वर्षी गायनाची सुरुवात करणाऱ्या ‘अलका याज्ञिक’, चक्क ओसामा बिन लादेनही बनला होता त्यांचा फॅन

हे देखील वाचा