Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानच्या मुलीने केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर, म्हणाली ‘…तयार आहे’

‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानच्या मुलीने केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर, म्हणाली ‘…तयार आहे’

बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनत असते, आणि का नाही बनणार शेवटी मुलगी आमिर खानची आहे. ती सोशल मीडियावर खुलेआम तिच्या प्रेमाचा खुलासा करताना दिसत आहे. आयराने नुकताच सोशल मीडियावर ती तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्या सोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिचे आणि तिच्या बॉयफ्रेंडमधील प्रेम दिसत आहे.

तिने हा ब्लॅक एँड व्हाइट सेल्फी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला पोस्ट केला आहे. फोटोमध्ये आयरा आणि नुपूर एकमेकांकडे बघत आहेत. हा फोटो पोस्ट करत तिने लिहिले आहे की, “लॉकडाऊनसाठी तयार आहे.” सोबतच तिने एक हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. याआधी देखील आणि आयराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, या व्हिडिओमध्ये ती नुपूरचे केस कापताना दिसत होती.

यावर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी आयराने एक फोटो पोस्ट केला होता. यात तिने अशे कॅप्शन दिले होते की, “व्हॅलेंटाईन डे ड्रीम बॉय, तुला प्रॉमिस करणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.” सोबतच आयरा तिच्या बहिणीच्या लग्नात तिच्या बॉयफ्रेंड सोबत गेली होती.

आयराने नुकताच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तिने तिच्या नावाचा योग्य उच्चार आणि लिखाणातील चुका सांगितल्या होत्या. तसेच तिचे नाव चुकीचे घेतील त्यांना पाच हजार रुपये दंड भरायला लागेल अशी देखील सूचना तिने इंस्टाग्राम वरून दिली होती. आयराने सांगितले की,”मला माझे सगळे मित्र चिडवतात की सगळे मला इरा या नावाने पुकारतात देतात. त्यामुळे मी ठरवले आहे की, सगळ्यांना सांगावं की माझं नाव इरा नसून आयरा आहे, आणि यानंतर जर कोणी मला इरा या नावाने आवाज दिला तर त्यांना पाच हजार रुपये दंड भरावा लागेल. हे पैसे मी दर महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटी दान करीत. मी सगळ्या प्रेस आणि मीडियावाल्यांना सांगत आहे की माझं नाव आयरा आहे.”

आयराला तिच्या वडिलांप्रमाणे अभिनय करायचा नाहीये, तर तिला पडद्याच्या मागे राहून काम करायला आवडेल, असे तिने सांगितले आहे. याआधी तिने युवराज सिंगची पत्नी हेजल कीचसोबत तिने एक शॉर्ट फिल्म केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लोकांची परख कशी करावी माहित नव्हते’ म्हणत राजेश्वरी खरातची वाढदिवशी भावनिक पोस्ट

-‘उफ्फ!’ नाकातल्या नथीने वाढवले हिना खानचे सौंदर्य, केला थेट चाहत्यांच्या काळजावर वार

-मोठी बातमी! ‘डान्स दीवाने ३’चा जज धर्मेश येलांडे कोरोनाच्या कचाट्यात, काही दिवसांपूर्वी १८ सदस्य झाले होते पॉझिटिव्ह

हे देखील वाचा