प्रत्येकच पुरुष आपल्या आयुष्यात एक यशाचे शिखर गाठल्यानंतर विवाह करतो. अनेक व्यक्तींची २ ते ३ लग्न झालेली असतात. त्यामुळे ते ३ ते ४ वेळा देखील बाबा होणे पसंत करतात. अशात बॉलिवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत ज्यांनी वयाच्या चाळीशीमध्ये देखील बाबा होणे पसंत केले. या बातमीमधून अशाच काही अभिनेत्यांविषयी जाणून घेऊ.
सैफ अली खान
सैफची दुसरी पत्नी करीना कपूरने २१ फेब्रुवारी २०२१ रोजी जहांगीरला जन्म दिला आणि सैफ चौथ्यांदा बाबा झाला. यावेळी त्याचे वय ५० वर्षे होते. या आधी तो पहिल्यांदा अमृता सिंगकडून दोन मुलांचा बाप झाला होता. त्याच्या पहिल्या दोन मुलांची नावे सारा अली खान आणि इब्राहीम अशी आहेत. (Irrespective of age this bollywood actor’s became a father in middle age)

संजय दत्त
अभिनेता संजय दत्त ५१ वर्षांचा असताना बाबा झाला. त्याची तिसरी पत्नी मान्यता दत्तने साल २०१० मध्ये दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा होती. तिच्या मेंदूमध्ये गाठ झाल्याने ती १९९६ रोजी मृत्यू पावली. तिच्याकडून त्याला एक मुलगी आहे. संजयच्या तीन मुलांची नावे तृषाला, शाहरान, इकरा अशी आहेत.

आमिर खान
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानने साल २००५ मध्ये त्याची असिस्टंट डायरेक्टर किरण राव बरोबर विवाह केला. त्यानंतर साल २०११ मध्ये किरणने आजादला जन्म दिला. आमिर बाबा झाला त्यावेळी त्याचे वय ४८ वर्षे होते. त्याची पहिली पत्नी रीना दत्तकडून त्याला दोन मुलं आहेत. त्यांची नावे ईरा आणि जुनैद अशी आहेत.

अक्षय कुमार
बॉलिबूडचा खिलाडी अक्षय कुमार साल २०१२ मध्ये दुसरी मुलगी निताराचा बाबा झाला. त्यावेळी त्याचे वय ४५ वर्षे होते. नितारा आधी त्याला एक मुलगा देखील आहे. साल २००२ मध्ये त्याचा पहिला मुलगा आरवचा जन्म झाला.

शाहरूख खान
बॉलिवूडचा किंग खान ४८ व्या वयात तिसऱ्यांदा बाबा झाला. साल २०१३ मध्ये त्याचा तिसरा मुलगा अबरामचा जन्म झाला. शाहरुखच्या आधीच्या दोन मुलांची नावे आर्यन आणि सुहाना अशी आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ
-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा
-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद










