बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते इरफान खान आज या जगात नाहीयेत पण ते त्याच्या चाहत्यांच्या मनामध्ये नक्कीच अजूनही कायम आहेत. 7 जानेवारी म्हणजे इरफान खान यांचा जन्मदिवस! परंतु आता ते हयात नाहीत त्यामुळे त्यांचा जन्मदिन यावर्षीपासून जयंती म्हणून साजरा केला जाईल. आज जर इरफान असते तर 55 वर्षांचे झाले असते. इरफान खान यांचा जन्म राजस्थानमधील एका मुस्लिम कुटुंबात झाला होता. त्यांना सुरुवातीला क्रिकेटमध्ये रस होता पण पैशाअभावी त्यांना क्रिकेटमध्ये फारशी प्रगती करता आली नाही. त्यानंतर त्यांनी अभिनयात स्वतःला आजमावून पाहिलं आणि त्यांचं नशीब चमकलं. इरफान खान यांनी बर्याच वेळा स्वतःचं नावही बदललं होतं.
इरफान खान आपल्या आयुष्याबद्दल अगदी स्पष्ट होते. त्यांनी अभिनयातून चित्रपटांमध्ये आपली ताकद दाखवलीच परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातून आजही लोकांना बरीच प्रेरणा मिळते. असा एक प्रसंग होता जेव्हा इरफान खान यांनी ‘खान’ हा शब्द त्यांच्या नावातून काढून टाकला होता. याशिवाय त्यांच्या नावामध्ये देखील एक ट्विस्ट आला होता जो इरफान यांनी स्वतः एका मुलाखतीच्या वेळी सांगितला होता.
वास्तविक, इरफान खान आपले नाव इंग्रजीमध्ये Irrfan Khan असे लिहित होते. ज्यात एक R अतिरिक्त होता. त्यांनी असं का केलं अशी विचारणा झाली असता, प्रत्युत्तरादाखल त्यांनी सांगितलं की दुसरा R त्यात वाढवल्यानंतर त्यांच्या नावाचा उच्चार वेगळ्या प्रकारे होत होता. इरफान यांनी त्यावेळी सांगितलं होतं की आपल्याला हा उच्चार खूप आवडला आहे, ज्यामुळे त्यांनी आपल्या नावावर अतिरिक्त R जोडला होता.
त्याचवेळी इरफान खान यांनी आपल्या नावावरून ‘खान’ हे आडनावही काढून टाकले होते. यामागील कारण स्पष्ट करताना त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘मी इरफान आहे, फक्त इरफान! मी काही काळापूर्वी माझ्या नावावरून ‘खान’ काढून टाकलं आहे. वास्तविक माझा धर्म, माझे आडनाव किंवा अशा कोणत्याही गोष्टीमुळे मी ओळखला जाऊ इच्छित नाही. माझ्या पूर्वजांच्या कार्यामुळे मी ओळखला जाऊ इच्छित नाही.’
आपल्याला ठाऊक आहे का की इरफान खान यांचं पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान हे होतं. इरफान त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जात होते. असं म्हणतात की इरफान डोळ्यांनी अभिनय करीत असत. इरफान यांनी आपल्या करिअरची सुरूवात ‘चाणक्य’ आणि ‘चंद्रकांता’ या टीव्ही मालिकांमधून केली होती. काही काळ मालिकांमधून काम केल्यानंतर त्यांनी ‘सलाम बॉम्बे’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर मागे वळून पाहिलच नाही. पूढे त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये जो इतिहास घडवला तो नव्याने सांगण्याची गरज नाहीये. अभिनयाला अगदी सहज आणि सोपं करून दाखवणाऱ्या इरफान खान यांना टीम दैनिक बोंबाबोंबकडून भावपुर्ण आदरांजली!
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अमोल मिटकरींनी साधला बीजेपीवर निशान; म्हणाले,राज्याला उर्फीमध्ये अडकवून….
कोकणात गावी जाऊन बालपणीच्या रम्य आठवणींमध्ये रमली प्रिया बापट, सुंदर व्हिडिओ केला शेअर