दिवंगत अभिनेता इरफान खानचा मोठा मुलगा बाबिल खान (Babil Khan)’काला’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अन्विता दत्त दिग्दर्शित या चित्रपटात तृप्ती डिमरी, स्वस्तिका मुखर्जी आणि अमित सियाल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. नुकताच या चित्रपटाची पोस्टर आणि तारिख जाहिर करण्यात आली आहे. यापूर्वी अन्विता दत्त यांचा बुलबुल हा चित्रपट हीट ठरला होता. अन्विता दत्त यांचे चित्रपट नेहमीच धमाल करतात, आता हा चित्रपट कोणते रेकाॅर्ड तोडतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान या चित्रपटात दिसणार आहे. काला या चित्रपटात बाबिल मुख्य भूमिकेत असून या चित्रपटात बाबिल काय खास करतो, हे महत्वाचे आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला रिलीज होणार आहे. नेटफलिक्सवर चित्रपट चाहत्यांना बघता येणार आहे. मंगळवारी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यासोबतच चित्रपटाची डेटही जाहिर करण्यात आली. मात्र, अन्विता दत्त यांच्या चित्रपटाची प्रेक्षक नेहमीच वाट पाहतात. आता बाबिल खानमुळे चित्रपटाची जास्त चर्चा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबिलचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर बघायला उत्सुक होते. या चित्रपटातील बाबिलच्या भूमिकेबद्दल जास्त काही कळू शकले नाहीये.
View this post on Instagram
स्वातंत्र्यपूर्व काश्मीरमध्ये घडलेल्या घटनांवर ‘काला’ ही कथा गेल्या शतकाच्या चौथ्या आणि पाचव्या दशकातील एका गायिकाची कथा आहे. काला असं या गायिकेचे नाव असून तिचा दु:खद भूतकाळ पुन्हा एकदा तिच्या वर्तमानासमोर येतो, तेव्हा तिची मेहनतीने कमावलेली प्रतिष्ठा आणि सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात आल्याचे दिसते. ‘काला’ चित्रपटाचा क्लायमॅक्स कलाच्या संगोपनाच्या वेळी घडलेल्या घटनांच्या गडद छाया म्हणून गायिकाच्या यशावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करते. परंतु ही युवा गायिका यशाच्या शिखरावर पोहचते हे दाखवण्यात आले आहे.
‘काला’ चित्रपटाच्या कलाकारांमध्ये स्वस्तिका मुखर्जीशिवाय बाबिल, तृप्ती आणि अमित सियाल, नीर राव, अविनाश राज शर्मा आणि आशिष सिंह यांचा समावेश आहे. या चित्रपटाची निर्मिती कर्णेश शर्मा यांची कंपनी क्लीन स्लेट फिल्म्स करत आहे. ही कंपनी कर्णेशने त्याची बहीण अनुष्का शर्मासोबत स्थापन केली होती, मात्र आता अनुष्का या कंपनीपासून वेगळी झाली आहे. क्लीन स्लेट फिल्म्सच्या ‘पाताळ लोक’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनचे शूटिंगही जोरात सुरू आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रंगिन शाम! सोशल मीडियावर सुरभी ज्योतीचा कहर… पाहिले का फोटो?
अक्षय कुमारचा जबरदस्त मोटिवेशनल वर्कआउट व्हिडिओ पाहून चाहते झालं चकीत; म्हणाले,’तू खरंच 55…’