‘बाबा आता या सर्वाला काय अर्थ आहे’?, इरफान खानच्या मुलाची भावनिक पोस्ट


बॉलीवूडमधील एक प्रभावी, उत्कृष्ट आणि डोळ्यांनी अधिक बोलणारा अभिनेता म्हणून इरफान खान ओळखला जातो. मागच्या वर्षी २९ एप्रिलला इरफानचे कॅन्सरमुळे निधन झाले. त्याने एका हरहुन्नरी आणि जिवंत अभिनयाने सर्व प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. इरफानला जाऊन आता वर्ष होईल तरीही कोणीच इरफानला विसरू शकले नाहीये, किंबहुना इरफान कधीच विसरला जाणार नाही. या ना त्या कारणांमुळे तो सतत आपल्या वाचनात, पहाण्यात, ऐकण्यात येतच असतो.

नुकतेच इरफान खानच्या मुलाने बाबिलने इंस्टाग्रामवर इरफान खानचा एक जुना फोटो आणि एक भावनिक पोस्ट शेयर केली. यात त्याने सांगितले आहे की अजूनही इरफान त्याच्या स्वप्नामध्ये येतो. बाबिलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, ” तुम्ही आम्हाला सोडून गेल्याचे माझ्या स्वप्नांना माहित नाही. आज तुम्ही स्वप्नात मला सांगितले की, तुम्ही मला लवकरच सोडून जाणार आहेत आणि तुम्ही मला बऱ्याच वेळ धरून ठेवले आहे. तेवढ्यात माझ्या फोनच्या आवाजामुळे मला जाग आली. मला एका सिनेमात अभिनयाची ऑफर आली आहे. पण बाबा आता तुमच्याशिवाय या सर्वाला काय अर्थ आहे? स्वप्न बघणे सुरूच ठेवले होते ( अश्रूंमुळे टाईप करणे किती अवघड होते ना? कोणीतरी अशासुद्धा लोकांसाठी फोन तयार करा, जे खूप रडतात.”

याआधी देखील बाबिलने एक मजेदार फोटो पोस्ट केला होता. हा फोटो सध्या व्हायरल होणाऱ्या ‘पावरी हो राही है’ च्या मिमचा होता. हा फोटो पोस्ट करताना त्याने लिहिले होते की, ” असच हसता हसता पोस्ट केला.” हा फोटो इरफानच्या ‘कारवां’ सिनेमाच्या एका सीनचा आहे. ज्यात लिहिले, ” ये हमारी कार है, और ये हम हैं, और ये हमारी पावरी हो रही है”

इरफानच्या कुटुंबातील सदस्य तर अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आठवणींना उजाळा देत त्या आठवणी, किस्से फॅन्ससोबत शेयर करत असतात.


Leave A Reply

Your email address will not be published.