Monday, July 8, 2024

शिक्षणाला ‘राम राम’ ठोकत इरफान खानचा मुलगा बाबिल करणार बॉलिवूडमध्ये प्रवेश

दिवंगत अभिनेता इरफान खान याचा मुलगा बाबिल लवकर पडद्यावर झळकणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्याने अजून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला नाही, तरी देखील सोशल मीडियावर त्याची खूप फॅन फॉलोविंग आहे. अशातच सोशल मीडियावर त्याची एक पोस्ट समोर आली आहे. यामध्ये त्याने त्याचे शिक्षण सोडणार आहे अशी घोषणा केली आहे. तो लवकरच तृप्ति डिमरीसोबत नेटफ्लिक्स ड्रामा ‘काला’ मधून त्याच्या करिअरची सुरुवात करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अन्विता दत्त करत आहेत. बिग बी यांनी देखील काही दिवसांपूर्वी ‘काला’चा व्हिडिओ शेअर केला होता.

सोमवार ( २८ जून) बाबिल खानने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो एका सीनची शूटिंग करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करून बाबिलने त्याच्या कॉलेजच्या मित्रांचे आभार मानले आहेत.

बाबिलने ही पोस्ट शेअर करून लिहिले आहे की, “मला तुमची खूप आठवण येईल. मुंबईमध्ये केवळ २-३ मित्र आहेत. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आज मी फिल्म बीए सोडत आहे. मी अभिनयासाठी हे सगळं सोडत आहे. वेस्टमिंटर विश्वविद्यालयाला बाय बाय, तुम्ही सगळे माझे खरे मित्र आहात.” ( Irrfan khan’s son babil khan will leave eduction, give information on social media)

बाबिल हा नेहमीच त्याचे वडिल इरफान खानसोबतच्या अनेक आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या वडीलांचा एक फोटो शेअर केला होता. या सोबत त्याने लिहिले होते की, “मी खूप मेहनत करत आहे यार, हे सगळं बघायला तुम्ही इथे असता तर किती बरं झालं असतं ना.” इरफान खान याचे मागच्या वर्षी आजारपणाने निधन झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा विशाल दादलानीने केला होता त्याच्या वाईट सवयीचा खुलासा; एका दिवसाला पित होता ४० सिगारेट, पुढे जे झाले…

-नाशकात पोलिसांकडून रेव्ह पार्टीचा पर्दाफाश! मराठी बिग बॉस फेम हिना पांचाळसह २२ जणांना अटक

-पहिल्यांदाच आपल्या रेस्टॉरंट ‘सोना’मध्ये गेली प्रियांका चोप्रा; पाणीपुरीचा आस्वाद घेतानाचा फोटो व्हायरल

हे देखील वाचा