जसप्रीत बुमराहची होणारी बायको कोण? जाणून घ्या सौंदर्याची खाण असलेल्या ‘त्या’ अभिनेत्रीबद्दल


क्रिकेट आणि मनोरंजन विश्वाचं नातं काही नवीन नाही. यात शर्मिला टागोर- पतौडीपासून ते विराट अनुष्का पर्यंतची अशी अनेक उदाहरणे आपल्याला पहावयास मिळतात. यातच आता एका नवीन नावाचा समावेश झाला आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय संघाचा धडाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आहे.

इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर बुमराहने बीसीसीआयकडून रजा मागितली आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, काही वैयक्तिक कारणांमुळे बुमराह चौथ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. त्यानंतर त्याचे माघार घेण्याचे कारण लग्न असून तो एका दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. बुमराहचे दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन सोबत अफयेर असल्याची चर्चा सगळीकडेच होत आहे.

एकीकडे बुमराहची अशी चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिने देखील सुट्टी घेतल्याने सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या सुट्ट्यांची तिने माहिती देऊन एक फोटो पोस्ट केला होता. तिच्या त्या कॅप्शनमुळे बुमराह आणि तिच्या लग्न होणार असल्याची चर्चा वेगाने होत आहे. मागील काही महिन्यांपासून या दोघात अफेयर असल्याचे देखील बोलले जात होते, याचे मुख्य कारण म्हणजे बुमराहने तिच्या एका पोस्टवर प्रतिक्रिया दिली होती आणि तेव्हापासूनच या चर्चेला सुरवात झाली.

परंतु बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने याची पुष्टी केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बुमराह नक्की कोणाशी लग्न करणार आहे याबत संशय कायम आहे. या दोघांच्या डेटची बातमी यापूर्वीही माध्यमात आली आहे, परंतु या दोघांनी सुद्धा याविषयी कधीही उघडपणे सांगितले नाही. त्यामूळे आता बुमराह लग्न करणार म्हटल्यावर त्याची भावी वधू अनुपमा तर नाही ना ? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दोघांनी एकत्र सुट्टी घेणे हा योगायोग कसा असू शकतो असे देखील चाहत्यांचे मत आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये बुमराहने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तो टीम इंडियाचा स्‍टार गोलंदाज आहे, तसेच आपल्या प्रत्येक सामन्यात तो चमकदार कामगिरी करत आपल्या चाहत्यांना नेहमीच खुश करत असतो. इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात त्याचा समावेश नाही आणि तो आता एकदिवसीय सामन्यात देखील खेळणार नाही.

सन २०१५ मध्ये मल्याळम चित्रपट ‘प्रेमम’ मधून अनुपमाने पदार्पण केले होते, यानंतर २०१६ मध्ये तेलुगू चित्रपटात देखील तिने आपली छाप सोडली होती. ती सध्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सलमान दुलकरच्या प्रोडक्शनमध्ये काम करते.


Leave A Reply

Your email address will not be published.