Monday, July 1, 2024

रश्मिकासोबत अफेअर? आता कुणाला करतोय डेट? अभिनेता विजय देवरकोंडाने स्वतः केला खुलासा

आपल्या आवडत्या कलाकारांबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. मग ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असो किंवा त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल. अनेकदा चाहते आवडत्या कलाकारांप्रमाणे स्वतःची लाईफस्टाईलही बदलत असतात. आवडत्या कलाकारांबाबत जाणून घ्यायला आवडणाऱ्या खास गोष्टींमध्ये त्यांच्या खासगी आयुष्यातील प्रेम प्रकरण, लग्न, कुटुंब या विषयांचा क्रमांक अगोदर लागतो.

डिअर कॉम्रेड, अर्जुन रेड्डी चित्रपटामुळे संपूर्ण देशभर प्रसिद्ध झालेला दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा सध्या अशाचे एका खासगी गोष्टीमुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीत बोलताना त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही काही खुलासे केलेत. (Vijay Deverakonda Personal life)

विजय सध्या त्याचा भाऊ आनंद याच्या ‘पुष्पका विमानम’ (Pushpaka Vimanam) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, दोन्ही भावांचा एक व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते इंटरनेटवर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. यापैकी एक प्रश्न विजयच्या डेटिंग लाइफबद्दल देखील होता. यात त्याला विचारण्यात आले होते की, तो कुणाला डेट करत आहे का? आणि जर होय तर ती व्यक्ती कोण?

या प्रश्नाचे उत्तर विजयने अगदी मजेशीर स्वरुपात दिले. तो म्हणाला की, “अलीकडेच माझे हृदय तुटले आहे.” यावर सर्वजण हैराण झाले. त्यावर त्याला पुन्हा विचारले की, हे खरं आहे का? आणि हे कोणी केले? यावर विजयचा भाऊ आनंद याने उत्तर दिले की की, “जशी माझी लिडिंग लेडी चित्रपटात पळून जाते तशीच.” असे म्हणताच सर्वजण चकित झाले.

अनेक दिवसांपूर्वी माध्यमांत अशी बातमी आली होती की, विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या रिलेशनशीपबद्दल मात्र कुणीही खात्रीशीर नव्हते. अगदी त्या दोघांनीही अनेकदा ही गोष्ट नाकारली. मात्र, त्यांचे चाहते हे सत्य नसून त्यांचे अफेअर होते, मात्र नंतर ब्रेक अप झाले असावे असेच समजतात. या दोघांनी २०१८ मध्ये ‘गीता गोविंदम’ चित्रपटामध्ये काम केले होते. यात  त्यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. त्यानंतर खऱ्या आयुष्यातही दोघे अनेकदा एकत्र दिसले होते.

विजय देवरकोंडाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो सध्या ‘लिगर’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून, तो अनन्या पांडेसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनद्वारे चित्रित केला जात आहे. नुकतीच बातमी आली होती की, या कलाकारांनी चित्रपटातील सर्वोत्कृष्ट गाण्यांसाठी शूटिंगही केले आहे.

अधिक वाचा –

कॅटरिना आणि विकी कौशल यांची रोका सेरेमनी संपन्न, ‘या’ दिग्दर्शकाच्या घरी गुपचूप झाला कार्यक्रम

दुसऱ्या दिवशीही ‘सूर्यवंशी’ची बंपर कमाई! दोन दिवसांत केला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

जड आवाजामुळे वर्गातून हाकलले जायचे, नंतर त्याच आवाजाने दिली खरी ओळख; वाचा पॉप क्वीन उषा उत्थुपबद्दल

हे देखील वाचा