बॉलिवूडमध्ये बाहेरून येत अतिशय मेहनतीने आणि संघर्षाने सुपरस्टार झालेली अभिनेत्री म्हणजे कॅटरिना कैफ (Katrina kaif). कॅटरिनाने तिच्या स्वतःच्या बळावर तिचे बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केले असून, आज जगभरात तिचे कोट्यवधी चाहते आहेत. कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असले तरी मात्र अजून तिला अपेक्षित यश मिळाले नाही. नुकताच ६ जानेवारी रोजी इसाबेल कैफने (Isabelle Kaif Birthday) तिचा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला इंडस्ट्रीतील कलाकार आणि फॅन्सकडून अनेक शुभेच्छा आल्या. या सर्व शुभेच्छांमध्ये विकी कौशलने (Vicky Kaushal) दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
विकीने त्याच्या सालीला इसाबेलला शुभेच्छा देताना इंस्टाग्राम स्टोरीवर इसाबेलचा फोटो पोस्ट तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विकीने शेअर केलेल्या पोस्टमधून इसाबेलच्या टोपण नावाचा देखील खुलासा केला आहे. विकीने इसाबेलचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा Isy. आज काम करण्याचा आणि पार्टी करण्याचा उत्तम दिवस आहे.” विकीची ही पोस्ट आणि कॅप्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.
विकीचा हा अंदाज आणि त्याची ही पोस्ट फॅन्सला खूपच आवडत असून तशा कमेंट्स देखील इंटरनेटवर येत आहे. विकी आणि इसाबेलचे खास बॉंडिंग देखील लक्षात येते. कॅटरिना आणि विकीच्या लग्नातील फोटोंवरून देखील त्यांच्यात असलेले बॉंडिंग स्पष्ट दिसले. कॅटरिना कैफने देखील इसाबेलला शुभेच्छा देताना त्यांच्या ग्रुप व्हिडिओ कॉलचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला होता. इसाबेलने अभिनेता सूरज पांचोलीसोबत ‘टाईम तो डान्स’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय ती लॅक्मे फॅशनवीकमध्ये दिसली होती. इसाबेल अजून बॉलिवूडमध्ये यश मिळवू शकली नसली तरी तिचे प्रयत्न चालू आहे.
कॅटरिना आणि विकीने ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न करत सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. मीडियापासून अतिशय गुप्त पद्धतीने त्यांचे राजस्थानमध्ये लग्न केले. सध्या कॅटरिना आणि विकी दोघेही त्यांच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, त्यांना सोबत काम करताना पाहण्यासाठी फॅन्स खूप उत्सुक आहेत.
हेही वाचा-