Monday, July 1, 2024

ईशा देओलने का केले होते स्वत:ला चित्रपटसृष्टीपासून दूर? खुद्द अभिनेत्रीने सांगितलं कारण

अभिनय क्षेत्र हे असं क्षेत्र आहे, जिथे कलाकारांना फक्त ८ तास काम करून चालत नाही. त्यांना आपला अभिनय उत्तम व्हावा यासाठी अपार कष्ट व मेहनत घ्यावी लागते. बारा तासांहून अधिक वेळ काम करावे लागते, जे पात्र आपल्याला साकारायचे आहे ते समजून घेतले नाही तर अभिनय दर्जेदार होत नाही. परिणामी चित्रपट फ्लॉप होतो. अशी सर्व तारेवरची कसरत करत असताना अनेक अभिनेत्री कला विश्वातून काही काळ ब्रेक घेतात. अभिनेत्री ईशा देओल देखील बराच काळ बॉलिवूडमधून गायब झाली होती. परंतु आता ती पुन्हा परतली आहे आणि तिने तिच्या गायब होण्यामागचे कारण देखील सांगितले आहे.

ईशा देओल ही काही काळासाठी एक दमदार अभिनय साकारणारी अभिनेत्री होती. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत. प्रत्येक स्त्रीला यशाचे शिखर गाठत असताना आपल्या कुटुंबाकडेही लक्ष देणे गरजेचे असते. या तारेवरील कसरतीमध्ये अनेक अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून हळूहळू दूर होतात. असेच काहीसे ईशाच्या बाबतीत देखील घडले. (Isha deol revealed that why she distance herself from films)

ईशाने आपल्या अभिनयाची सुरुवात २००२ साली प्रदर्शित झालेला “कोई मेरे दिल से पूछे” या चित्रपटापासून केली. यानंतर अभिनेत्रीने अनेक चित्रपटांत काम केले. सलग आठ वर्षे चित्रपटात काम केल्यानंतर २०११ साली तिने हाती घेतलेल्या अनेक चित्रपटांतून माघार घेतली.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ईशाने सांगितले की, भरत यांच्याशी तिचा विवाह झाला होता. आपली मुलं आणि कुटुंब सांभाळून अभिनय करणे तिला कठीण जात होते. आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष होत असल्याने तिने चित्रपटांतून काढता पाय घेतला. चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री आपल्या कुटुंबासाठी हे पाऊल हमखास उचलतात.

परंतु ईशाने १० वर्षांच्या ब्रेकनंतर आता पुन्हा चित्रपटात कमबॅक केलं आहे. अजय देवगणसह ती वेब डेब्यू ‘रुद्र’मध्ये झळकणार आहे. ईशाने या चित्रपटासाठी ‘लूथरची’ मुख्य आवृत्ती पाहिली आहे. ‘रुद्र’ हा चित्रपट ‘लूथरचा’ हिंदी रिमेक आहे. अजय आणि ईशाने याआधी एकमेकांबरोबर अनेक चित्रपट केले आहेत. ‘काल’, ‘ युवा’, ‘मैं ऐसा ही हूं’ या चित्रपटात त्या दोघांनी सोबत काम केले आहेत. तसेच ईशा देओल आता एक निर्माती देखील बनली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भल्या पहाटे अमिताभ बच्चन यांनी उलगडले सोशल मीडियाचे रहस्य; नेटकरी म्हणाले, ‘झोपा आता’

-हम साथ साथ है! रिया कपूरच्या लग्नानंतर पुन्हा एकत्र आले ‘कपूर खानदान’, सोनम कपूरने केले फोटो शेअर

-व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी

हे देखील वाचा