Wednesday, January 21, 2026
Home मराठी उफ्फ! ‘बानू’च्या नजरेच्या बाणाने थेट केला चाहत्यांच्या काळजावर वार, पाहा व्हिडिओ

उफ्फ! ‘बानू’च्या नजरेच्या बाणाने थेट केला चाहत्यांच्या काळजावर वार, पाहा व्हिडिओ

‘जय मल्हार’ या मालिकेतील बानू आठवते का? हो तीच ती जिने म्हाळसानंतर खंडेरायांसोबत संसार थाटला. मालिकेमध्ये ही बानूची भूमिका अभिनेत्री ईशा केसकरने साकारली होती. यातील तिच्या अभिनयाची चांगलीच प्रशंसा झाली होती. याद्वारे ईशा घराघरात पोहचली. शिवाय अभिनेत्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. मालिकेत ती जितकी साधीसुधी होती, तितकीच ती खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस आहे. ती अनेकदा फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांमध्ये चर्चा रंगवत असते. असाच तिचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

हा व्हिडिओ ईशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या अदा पाहून कोणीही सहज तिच्या प्रेमात पडेल. अभिनेत्री यामध्ये एका गाण्यावर एक्सप्रेशन्स देताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी ती डोळा देखील मारते. ईशाच्या नजरेतून निघालेला बाण चाहत्यांच्या थेट काळजावर लागला असावा! यातील तिची सुंदरता अगदी पाहण्यासारखी आहे.

हा व्हिडिओ ईशाच्या चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला आतापर्यंत ६ हजाराहून अधिक लाईक्स भेटले आहेत. तर चाहते व्हिडिओच्या कमेंट्स सेक्शनमध्ये अभिनेत्रीच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

‘जय मल्हार’ मालिकेत बानूची भूमिका साकारून ईशाने चाहत्यांच्या मनात घर केलं. अखेरच्या वेळी ती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत शनायाची भूमिका साकारताना दिसली होती. सोज्वळ भूमिकेत दिसणाऱ्या ईशाला अचानक ग्लॅमरस भूमिकेत बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हिना खानचा ब्रेकअप? अभिनेत्रीच्या लेटेस्ट पोस्टमुळे चाहते पडले चिंतेत

-आर्यन खानला सकाळी ७ वाजता मिळणार जेलमधील जेवण, ‘या’ गोष्टीसाठी तरसणार शाहरुखचा मुलगा

-‘हे नक्की शाल्विताच का?’ ओम अन् स्वीटूच्या ‘त्या’ व्हिडिओवर रंगल्यात चाहत्यांच्या चर्चा

हे देखील वाचा