सध्या डिजिटल माध्यमाला खूप मोठी लोकप्रियता मिळाली आहे. मोठ्या मोठ्या कलाकारांना या माध्यमाची भुरळ पडली आहे. म्हणूनच अनेक दिग्गज कलाकारांनी या क्षेत्रात पदार्पण केले आहे. डिजिटल माध्यम टीव्ही आणि चित्रपटांमध्ये फ्लॉप ठरलेल्या कलाकारांसाठी तारणहार ठरले आहे. असे अनेक कलाकार या क्षेत्रात काम करत आहे, जे बॉलिवूडमध्ये आपल्याला दिसले होते.
अशीच एका बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे ईशा कोप्पीकर. ‘खल्लास गर्ल’ म्हणून ओळख मिळवलेल्या ईशाने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिला प्रसिद्धी देखील भरपूर मिळाली मात्र अपेक्षित यश काही मिळू शकले नाही. पुढे तिने लग्न केले आणि संसारात व्यस्त झाली. आता बऱ्याच काळानंतर ईशा डिजिटल माध्यमातून कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे. नुकतीच तिने एका मोठ्या वृत्तपत्राला मुलाखत दिली यावेळी तिने अनेक प्रश्नांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.
या मुलाखतीमध्ये ईशा ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल म्हणाली, “ओटीटी प्लॅटफॉर्म हे माध्यम एका गेम चेंजर म्हणून समोर आले आहे. या माध्यमामुळे लोकांमध्ये असलेल्या प्रतिभेला ओळख मिळत आहे. आणि आपला थेट या ओटीटी जगाशी सामना होत आहे. मी सुद्धा खूप चांगले आणि हटके काम करू इच्छिते. एका उत्तम आणि प्रतिभावान अभिनेत्रीच्या रूपात माझी ओळख बनवू इच्छिते रस्ताही मी एका चांगल्या संधीच्या शोधात आहे.”
ग्लॅमर क्षेत्राबद्दल खासकरून या क्षेत्रात वावरणाऱ्या अभिनेत्रींबद्दल अनेकांचा असा विचार असतो की, लग्नानंतर अभिनेत्रीची लोकप्रियता कमी होते आणि त्यांना मुख्य भूमिका मिळणे बंद होते. बऱ्याच अभिनेत्रींबाबत आपण असा अनुभव घेतला असेल. लग्नानंतर अभिनेत्रींना काम मिळणे देखील कमी होते आणि त्या सहायक भूमिकेपुरताच मर्यादित होतात. याच मुद्द्याला खोडत ईशा पुढे म्हणाली, “आज काळ बदलला आहे शिल्पा शेट्टी, अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण आदी अनेक अभिनेत्रींनी लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम करणे सुरू ठेवले आहे. लग्नानंतर महिलांचे आयुष्य संपून जाते अशा चुकीच्या विचारांमधून आपण बाहेर आले पाहिजे. आम्ही आम्हाला आवडणारे काम करतो. जर आमच्या काम करण्यामुळे आम्ही कोणाला प्रेरित करत असू, तर हे नक्कीच खूप चांगले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी
-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’