‘इश्क विश्क’ या चित्रपटातून शाहिद कपूर आणि अमृता राव यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या दोघांव्यतिरिक्त आणखी एका अभिनेत्रीने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ती अभिनेत्री म्हणजे शहनाझ ट्रेजरीवाला. बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि ट्रॅव्हल रायटर शहनाझ मंगळवारी (29 जून) आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 29 जून, 1981 मध्ये मुंबई येथे झाला होता. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या कारकिर्दीविषयी. चला तर मग सुरुवात करूया… (ishq vishk fame actress shenaz treasurywala’s birthday let’s know about her)
पारसी कुटुंबात जन्मलेली शहनाझ ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तिचे पुढचे शिक्षण घेण्यासाठी न्यू यॉर्कला गेली होती. तिथे तिने स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म संस्थानमधून मेथड ॲक्टिंगचे शिक्षण घेतले. याच वेळी तिने एक रायटींगचा देखील कोर्स केला होता.
कॉलेजमध्ये असताना एक फोटोग्राफरची तिच्यावर नजर पडली आणि तिला मॉडेलिंग करायची संधी मिळाली. यानंतर एमटीव्ही नेटवर्क एशियाच्या एमटीव्हीज मोस्ट वाँटेड प्रोग्रॅममध्ये व्हिडिओ जॅकीचे काम करण्याआधी तिने काही जाहिरातीतदेखील काम केले आहे.
शहनाझचे वडील मरीन हे इंजिनीअर होते. चित्रपटात पदार्पण करण्याआधी तिने टेलिव्हिजनवर देखील काम केले आहे. शहनाझची पेप्सीची जाहिरात खूप प्रसिद्ध झाली होती. बॉलिवूडमध्ये येण्याआधी तिने 2001 तेलुगु ‘एढुरूलेनी मनिषि’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर 2003 मध्ये तिने ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
या चित्रपटात ती द्वितीय मुख्य भूमिकेत होती. जी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटानंतर तिने ‘डेल्ही बेली’, ‘रेडिओ’, ‘लव्ह का दी एंड’, ‘आगे से राईट’ यांसारख्या हिंदी चित्रपटात काम केले आहे. हे एवढे चित्रपट करूनही तिचे करिअर नाही बनू शकले आणि अमेरिकेला गेली. तिकडे जाऊन शहनाझ ट्रॅव्हल ब्लॉगर बनली.
शहनाझला लिहिण्याची खूप आवड आहे. तिने अनेक ब्रँडसाठी ट्रॅव्हल आर्टिकल लिहिले आहेत. यासोबतच तिने अनेक ट्रॅव्हल शो होस्ट केले आहेत. 2011 मध्ये आलेल्या ‘लव्ह का दी एंड’ या चित्रपटाचा तिने स्क्रीनप्ले लिहिला होता. जेव्हा ती न्यूयॉर्कला गेली, तेव्हा तिला अमेरिकन शो ‘वन लाईफ टू लिव्ह’ यामध्ये एक मोठा रोल मिळाला होता. या शोमध्ये तिने तीन वर्ष काम केले होते. यानंतर ती 2015 मध्ये तिने अमेरिकन कॉमेडी ड्रामा ‘ब्राऊन नेशन’मध्ये काम केले.
शहनाजने 2017 मध्ये पुन्हा बॉलिवूडमध्ये आली तिने टायगर श्रॉफ आणि निधी अग्रवालसोबत ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटात काम केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नादच खुळा! श्रीदेवीची लाडकी लेक बनलीय ‘लालपरी’, फोटोवर बहीण सोनमसह इतर मैत्रिणींच्या हटके कमेंट्स
–एका फोटोत केले चक्रासन, तर दुसऱ्यात पडलीय बेडवर; पाहा दीपिकाचे ‘एक्सपेक्टेशन वर्सेस रियॅलिटी’










