जॅकी चॅन हे सिनेविश्वातील असेच एक नाव आहे, जे केवळ आपल्या जबरदस्त अॅक्शनसाठी ओळखले जात नाही, तर आपल्या कॉमेडीमुळे प्रेक्षकांच्या मनावरही राज्य करतात. ते असे अभिनेते आहेत ज्यांना जवळपास सर्वच देशात पसंत केले जाते. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या हाँगकाँगच्या मार्शल आर्टिस्टने आतापर्यंत जवळपास 131 चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या जॅकी यांचा शुक्रवारी (7 एप्रिल) 69 वा वाढदिवस आहे. जरी तुम्ही जॅकी चॅनबद्दल बरेच काही ऐकले असेल पण तुम्हाला माहित आहे का की तुमच्या या आवडत्या अभिनेत्याचे भारताशी खास नाते आहे. जाणून घेऊया….
जॅकी चॅन यांनी 68 व्या वर्षी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. जॅकी चॅन यांनी ज्युडो, तायक्वांदोसह मार्शल आर्टचे इतर अनेक प्रकार शिकले आहेत. जॅकी चॅनने 70 आणि 80 च्या दशकात हाँगकाँग सिनेमात काम करायला सुरुवात केली. 90 च्या दशकात ते एक मोठा स्टार बनले होते. तुम्ही जॅकी चॅनला अनेक अॅक्शन फिल्म्समध्ये मोठ्या स्टार्ससोबत काम करताना पाहिलं असेल, पण तुम्हाला माहीत आहे का की त्यांनी भारतीय स्टार्ससोबत स्क्रीनही शेअर केली आहे? हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल पण हे अगदी खरे आहे. तुमच्या आवडत्या अॅक्शन अभिनेत्याने बॉलिवूड अॅक्शन हिरो सोनू सूदसोबत काम केले आहे.
2017 मध्ये कॉमेडी अॅक्शन फिल्म ‘कुंग फू पांडा’मध्ये हा चिनी स्टार बॉलिवूड कलाकारांसोबत काम करताना दिसला होता. हा चित्रपट पुरातत्वशास्त्राचे प्राध्यापक जॅक यांच्याभोवती फिरतो, जो भारताचा हरवलेला खजिना शोधण्यासाठी एका भारतीय प्राध्यापकासोबत काम करतो. या दोन कलाकारांसोबत बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी आणि अमायरा दस्तू देखील यात दिसल्या आहेत. या चित्रपटाचे अर्धे चित्रीकरण चीनमध्ये तर अर्धे भारतात झाले आहे.
‘कुंग फू योगा’ चित्रपटात दिशा पटानीसोबत जॅकी चॅनही डान्स करताना दिसला होता. पण तुम्हाला माहीत आहे का की, आपल्या खतरनाक अॅक्शनने जगभरात प्रसिद्ध झालेला जॅकी चॅन डान्स करायला घाबरतात. भारतात चित्रपटाचे प्रमोशन करत असताना जॅकी चॅनने खुलासा केला की, त्यांना भारतीय चित्रपटांमधील नृत्य गाणे अॅक्शनपेक्षा अवघड वाटते. जॅकीने म्हटले होते की, “माझ्यापेक्षा माझे डोके हलत नाही. मी कोरिओग्राफरला सांगितले की मला सोपे स्टेप्स द्या.”
जॅकी चॅन यापूर्वीही भारतीय सिनेसृष्टीतील अभिनेत्यांसोबत काम करताना दिसले आहेत. याआधी त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतसोबत स्क्रीन शेअर केली होती. मल्लिका शेरावत आणि जॅकी चॅन यांनी २००५ मध्ये आलेल्या ‘द मिथ’ चित्रपटात काम केले होते. मल्लिकाने ‘द मिथ’मध्ये खूप छोटी भूमिका केली होती, ज्यामध्ये ती फक्त आठ मिनिटे जॅकीसोबत पडद्यावर दिसली होती. (jackie chan birthday special know about jackie chans india connection as he worked in film kung fu yoga with sonu sood and disha patani)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘फकाट’चे हायली कॉन्फिडेन्शिअल टीझर प्रदर्शित
हॉट फोटोंसाठी ट्रोल झाली उर्वशी रौतेला; युजर्स म्हणाले, ‘ऋषभ पंतची 16 हाडे तुटली अन्…’