Friday, July 5, 2024

तब्बल १७ वेळा जॅकी श्रॉफ यांनी लगावली होती अनिल कपूरच्या कानशिलात; कारण आहे खूपच रंजक

बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांच्या अभिनयाने आज त्यांचे सगळेच चाहते खुश आहेत. बघायला गेलं तर या दोन कलाकारांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. पण सन १९८९ साली प्रदर्शित झालेल्या ‘राम लखन’ या चित्रपटात त्यांची चांगली बाँडिंग दिसून आली. त्या दोघांनी ऑनस्क्रीन भावांची भूमिका निभावली होती. याच वर्षी त्यांचा आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता त्याचे नाव होते ‘परींदा’. या चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा हे होते.

परिंदा हा चित्रपट प्रदर्शित होऊन ऑक्टोबर 2019 मध्ये 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त विधू चोप्रा यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर या चित्रपटाबाबत चर्चा करताना दिसत आहे. ते या चित्रपटातील ते किस्से शेअर करत होते, ज्याची माहिती खूप कमी जणांना आहे.

जॅकी श्रॉफ यांना सगळेजण प्रेमाने ‘भिडू’ या नावाने आवाज देतात. यावेळी जॅकी श्रॉफ यांनी चित्रपटातील त्या सीनबद्दल सांगितले जो एकदम परफेक्ट करण्यासाठी त्यांनी 1, 2 नाही तर तब्बल 17 वेळा अनिल कपूर यांना कानशिलात मारली होती. अनिल कपूर यांना वाटत होते की, हा सीन एकदम इमोशनसह झाला पाहिजे. यासाठी त्यांनी खूप टेक घेतले होते. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये जॅकी श्रॉफ सांगतात, “अनिलला वाटत होते की, हा सीन असा व्हावा जसं काय खरंच त्याचा मोठा भाऊ त्याला मारत आहे. दिग्दर्शकाने पहिला शॉटला ओके असे म्हटले होते. हावभाव देखील चांगले होते. पण अनिल म्हणाला की, नाही मला आणखी एक शॉट द्यायचा आहे. त्यांनतर मी त्याला आणखी एकदा कानाखाली मारली. असं करत जवळपास मी 17 वेळा कानाखाली मारली होती. या सीनमध्ये अभिनय करताना मी विसरून गेलो होतो की, मी अनिल कपूरला मारत आहे.”

ही गोष्ट अनेकांना माहित नसेल की, अनिल कपूर हे जॅकी श्रॉफपेक्षा काही महिन्यांनी मोठे आहेत. तरीही त्यांनी नेहमीच त्यांच्या लहान भावाचे पात्र निभावले आहे. या आधी दोघांनाही ‘मुंबई सागा’ या चित्रपटात एकत्र पाहिले होते. त्यांनी पुढे जाऊन देखील एकत्र काम करावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा