Friday, July 5, 2024

जॅकी यांनी शेअर केला सलमानसोबत काम करण्याचा अनुभव; म्हणाले, ‘राधे चित्रपटात…’

चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये खास स्थान निर्माण केले. त्याचबरोबर त्यांनी ते कायम टिकवून ठेवण्याचा प्रयत्नही केला. त्यांनी नेहमी आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. अनेक दशकापासून त्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केले. त्याचबरोबर आजही चाहत्यांमध्ये त्यांची तितकीच क्रेझ आहे. याच दिग्गज कलाकरांपैकी एक बॉलिवूडचे जग्गू दादा उर्फ जॅकी श्रॉफ हे आहेत.

जॅकी श्रॉफ यांनी आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकापेक्षा एक पात्र रुपेरी पडद्यावर साकारले आहे. जॅकी यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात त्यांचे चाहते आहेत. त्यांच्या या मोठ्या कारकिर्दीमुळे आणि त्यांच्या जीवन संघर्षामुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळाली. त्याचबरोबर त्यांचे असे मत आहे की, त्यांना खूप काही शिकायला मिळालं. जॅकी यांचं असं मत आहे की, नेहमी प्रॅक्टिकल राहावं.

जॅकी यांचा स्वतःचा मंत्र
जॅकी यांनी त्यांच्या प्रॅक्टिकल राहण्याचा मंत्रासंबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. ते म्हणतात की, हे खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त तुमचं डोकं शांत ठेवायचं आहे आणि मग संधी स्वतः तुमच्याकडे येईल. जॅकी म्हणाले की, “प्रॅक्टिकल राहण्याचा माझा मंत्र अगदी सोपा आहे, तुम्हाला फक्त तुमचं डोकं शांत ठेवावं लागेल आणि संधी स्वतः तुमच्याकडे येतील. मी विविध प्रकारच्या भूमिका केल्या असल्या, तरी यावेळी मला थोडी वेगळी भूमिका साकारायची आहे.”

‘राधे’कडून मिळाले प्रोत्साहन
जॅकी पुढे म्हणाले की, “‘राधे’ या चित्रपटामुळे मला एक स्थान आणि एक पात्र मिळाले आहे. या चित्रपटातून मला लोकांना हसवण्याची संधी मिळाली. त्यामुळे मला अशा आणखी भूमिका साकारायचे बळ आणि प्रोत्साहन मिळेल आहे.” बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि जॅकी श्रॉफ ‘राधे’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. तेव्हा जॅकी म्हणाले की, ते ‘दबंग’ अभिनेत्याला अनेक वर्षापासून ओळखतात.

सलमानसोबत काम करून झाला आनंद
त्याचबरोबर जॅकी श्रॉफ पुढे म्हणाले की, “मी सलमानला इंडस्ट्रीमध्ये त्याच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ओळखतो. त्याच्यासोबत काम करायला मला नेहमीच आनंद वाटतो.” त्याचबरोबर ‘राधे’ या चित्रपटाचा प्रीमियर २६ सप्टेंबर रोजी ऍंड पिक्चर्सवर होणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’

-‘तो केवळ तरुण अभिनेत्रींसोबतच काम करतो’, सलमानसोबत पुन्हा काम करण्याच्या प्रश्नावर भाग्यश्रीने दिले उत्तर

हे देखील वाचा