Friday, February 21, 2025
Home नक्की वाचा अनिल कपूरची मस्ती त्यालाच भोवली; एका चापटीने भागलं नाही, म्हणून जग्गू दादाकडून १७ वेळा खाल्ली कानाखाली

अनिल कपूरची मस्ती त्यालाच भोवली; एका चापटीने भागलं नाही, म्हणून जग्गू दादाकडून १७ वेळा खाल्ली कानाखाली

इंडस्ट्रीतील अनेक सिनेमे हे कलाकारांच्या नावामुळे, केमिस्ट्रीमुळे, तसेच फायटिंग सीन्समुळे चालतात. सध्याच्या काळातील दमदार कलाकारांचं नाव घ्यायचं झालं, तर त्यात पंकज त्रिपाठी, मनोज वाजपेयी यांसारख्या कलाकारांचा आवर्जुन समावेश होतो. यांचे सिनेमे पाहण्यासाठी चाहते खूपच आतुरलेले असतात. असेच काही कलाकार 80 आणि 90 च्या दशकातही होते, जे आपल्या जबरदस्त अभिनयाने पडद्यावर आपल्या पात्रात जिवंतपणा आणायचे. आपल्या कामाप्रती समर्पित होणं काय असतं हे त्यांच्या अभिनयातून समजतं. ते अभिनेते आजही रुपेरी पडद्यावर झळकत आहेत. त्यांना आपण खूप जवळून ओळखतो. ते अभिनेते म्हणजेच अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ. या दोघांनी तब्बल 12 सिनेमात एकत्र काम केलंय. मात्र, एक सिनेमा असा होता, ज्यात सीन ओके होऊनही अनिल कपूरने जॅकी श्रॉफकडून तब्बल 17 वेळा चापट खाल्ली होती. काय होता तो किस्सा चला जाणून घेऊया…

जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांची जोडी एकेकाळी बॉलिवूडमधील अतिशय हिट जोड्यांपैकी एक होती. सिनेमासोबतच त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील मैत्रीचे किस्से देखील अनेकदा चर्चेत असतात. ‘राम लखन’ या सिनेमावेळी त्यांच्यात चांगले मैत्रीचे नाते निर्माण झाले होते. तर वळूया आपल्या विषयाकडे.

हा किस्सा आहे जवळपास तीसेक वर्षांपूर्वीच्या ‘परिंदा’ सिनेमातील. सहसा सिनेमातील एखादा सीन शूट करायचा असेल, तर चुका बिका पकडून तो 2-3 वेळा रिटेक केला जातो. पण या सिनेमातील एक सीन 17 वेळा शूट करण्यात आला होता. आणि त्यासाठी अनिल कपूरला 17 वेळा चापट खावी लागली होती.

‘परिंदा’ सिनेमातील त्या सीनविषयी जॅकी श्रॉफनेच एका मुलाखतीत सांगितलं होतं. या सिनेमातील एका सीनमध्ये जॅकी श्रॉफला अनिल कपूरला चापट मारायची होती. ती जॅकीने मारली आणि सीन एकाच टेकमध्ये ओकेही झाला होता, पण अनिल कपूरला काय तो आवडलाच नाही. भावाला सीन कसा एकदम परफेक्टच पाहिजे होता.

या सीनविषयी मुलाखतीत सांगताना जॅकी श्रॉफ म्हणाला होता की, “पहिल्या सीनमध्ये तो सीन योग्य पद्धतीने शूट झाला होता, पण अनिल कपूरला सीन परफेक्ट हवा होता. त्यासाठी मी त्याच्या 17 वेळा कानशिलात लगावली होती.”

सीनविषयी सांगताना जॅकी श्रॉफ पुढे म्हणाला, “मी पहिल्यांदा त्याला कानशिलात मारली आणि दिग्दर्शकाने पटकन सीन ओके केला, पण अनिल कपूरला तो सीन फारसा आवडला नाही. तो मला म्हणाला की, तू फार प्रेमाने मारतोस, जोरात मार आणि त्याने पुन्हा शॉट रेडी करायला सांगितला. त्याला तो सीन प्रभावी आणि जिवंत बनवायचा होता.”

“अनिलला हा शॉट आवडला नव्हता या कारणामुळे मला त्याला 17 वेळा कानशिलात मारावी लागली. त्याला एवढे मारणे मला अजिबात आवडले नव्हते पण त्याला तो शॉट चांगला येण्यासाठी मला मारावे लागले. जर मी हवेमध्ये मारलेे असते तरी त्याच समाधान झाले नसते आणि तो सीन परफेक्ट मिळाला नसता,” असेही जॅकीने या सीनबद्दल सांगितले होते.

त्या 17 रिटेकमुळे शॉट तर ओके झालाच, पण बिचाऱ्या अनिल कपूरचा गाल मात्र लालेलाल झाला. तर अशाप्रकारे अनिल कपूरने एकाच टेकमध्ये सीन ओके होऊनही 17 वेळा चापट खाल्ली होती.(jackie slapped anil kapoor 17 times)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनिल कपूर यांना यामुळे वाटायची जॅकी श्रॉफची भीती, स्वतः केला खुलासा

साठच्या दशकात पहिल्यांदाच ‘बिकिनी गर्ल’ने निर्माण केली हाेती दहशत, निषेधाचे लावले गेलेले पोस्टर

हे देखील वाचा