Friday, July 5, 2024

जॅकलिन आणि बादशाह पुन्हा करणार धमाका, दिसणार ‘या’ नव्या म्युझिक व्हिडिओमध्ये

सध्या कोरोनाच्या वाईट काळामुळे चित्रपट तर प्रदर्शित होत नाहीयेत. मात्र, म्युझिक व्हिडिओला सुगीचे दिवस आले आहेत. काही वर्षांपूर्वी अनेक मोठमोठ्या गायकांनी त्यांचे म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित केले होते. मात्र, नंतरच्या काळात म्युझिक व्हिडिओ ही पद्धत बऱ्यापैकी मागे पडत गेली. पण आता पुन्हा म्युझिक व्हिडिओला तुफान लोकप्रियता मिळत आहे. त्यामुळे अनेक अल्बम सध्या प्रदर्शित होत आहेत.

बादशाह सध्या म्युझिक इंडस्ट्रीमधला एक लकीचार्म ठरत आहे. त्याचा प्रत्येक व्हिडिओ, त्याचे प्रत्येक गाणे सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा प्रदर्शित झालेला ‘गेंदा फूल’ हा म्युझिक व्हिडिओ तुफान गाजला. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस दिसली होती.

आता पुन्हा ही हिट जोडी एका नवीन व्हिडिओमध्ये दिसणार आहे. या व्हिडिओचे नाव आहे ‘पानी पानी.’ बादशाह आणि जॅकलिनने नुकतेच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या नवीन गाण्याचे पोस्टर शेअर करत सर्वांना सुखद धक्का दिला आहे.

https://www.instagram.com/p/CPijNTtAlVt/?utm_source=ig_web_copy_link

बादशाहने पोस्टर शेअर करत लिहिले की, “मला असे वाटते की तुम्हा सर्वांना माहित असावे की लवकरच काय येत आहे.” या दोघांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये त्यांच्यात दिसणारी केमिस्ट्री आपण अगदी सहज पाहू शकतो. या पोस्टरमध्ये बादशाहने जॅकलिनला त्याच्या मिठीत घेतलेले आपल्याला दिसते. या पोस्टरवर मोठमोठ्या अक्षरात ‘पानी पानी’ लिहिलेले असून हे गाणे सारेगामा ब्रँडचे ओरिजनल गाणे आहे.

‘पानी पानी’ हे गाणे आस्था गिल आणि बादशाहने गायले असून, कंपोज देखील त्यांनीच केले आहे. या गाण्याचे संपूर्ण शूटिंग राजस्थानच्या जैसलमेरमध्ये केले आहे. जॅकलिन आणि बादशाहचे आधी प्रदर्शित झालेले ‘गेंदा फुल’ गाणे जबरदस्त हिट झाले होते. शिवाय या गाण्याचा समावेश सर्वात जास्त बघितल्या गेलेल्या गाण्यांच्या यादीत झाला असून, चौथ्या नंबरवर हे गाणे आहे.

जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने सलमानच्या राधे सिनेमात एक आयटम साँग केले होते. सोबतच जॅकलिन लवकरच ‘बच्चन पांडे’, ‘भूत पुलिस’, ‘अटॅक’, ‘सर्कस’ आणि ‘राम सेतू’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा