Monday, July 1, 2024

जॅकलीन फर्नांडिसच्या नव्या गाण्याने लावले चाहत्यांना वेड, ‘मूड मूड के’ गाणे चाहत्यांच्या भेटीला

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस तिच्या अभिनयाप्रमाणेच दमदार डान्ससाठी प्रसिद्ध आहे. तिच्या डान्सवर चाहते अक्षरशः फिदा होत असतात. तिच्या प्रत्येक गाण्यातील डान्स पाहण्यासारखा असतो. याच पार्श्वभूमीवर आता चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवायला जॅकलीनचे नवीन जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे सध्या त्याचीच जोरदार चर्चा होत आहे.

लोकप्रिय अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या ‘मूड मूड के’ गाण्याची अनेक दिवस झाले चर्चा सुरू होती. आता ते गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यामध्ये जॅकलीनसोबत मिशेल मोरोन डान्स करताना दिसत आहे. सध्या हे गाणे प्रेक्षकांना चांगलेच वेड लावताना दिसत आहे. या गाण्यातून मिशेल पहिल्यांदा चित्रपट क्षेत्रात काम दमदार एंट्री करत आहे.जॅकलीनचे ‘मूड मूड के’ गाणे एक पार्टी साँग आहे. गाण्यातील जॅकलीन आणि मिशेलची जोडी खूपच दमदार दिसत आहे. नेहमी प्रमाणे जॅकलीनने आपल्या डान्सच्या तडक्याने सगळ्यांनाच घायाळ केले आहे. गाण्यातील तिचे प्रत्येक मुव्ह चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत. ती गाण्यामध्ये एका गुंडाला पकडण्यात पोलिसांना मदत करत असल्याचे दिसत आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक त्यावर आनंदी प्रतिक्रिया देत आहेत त्याच बरोबर त्यांना जॅकलीनसुद्धा गाण्याच्या प्रतिक्रिया विचारत आहे.

याबद्दल आपल्या सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये तिने ” शेवटी ते इथे आहे. मिशेल मोरोनसोबत ‘मूड मूड के’ गाण्याचा अधिकृत व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. तुम्ही हे गाणे पटकन बघा आणि त्यामधील कोणता भाग आवडला ते लवकर सांगा” असा संदेशसुद्धा दिला आहे. ‘मूड मूड के’ गाणे प्रसिद्ध गायिका टोनी कक्कर आणि नेहा कक्करने गायले आहे. गाण्यामुळे अभिनेत्री जॅकलीन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच ‘सर्कस’ आणि ‘राम सेतू’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलेल्या जॅकलीनकडे आगामी काळात खूप मोठे मोठे चित्रपट आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा