Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ब्रॅंडेड कपडे, आयफॉन, आयपॅड आणि 24 तास व्हिडिओ कॉल, सुकेश चंद्रशेखरचा जेलमध्येही असा होता थाट

ब्रॅंडेड कपडे, आयफॉन, आयपॅड आणि 24 तास व्हिडिओ कॉल, सुकेश चंद्रशेखरचा जेलमध्येही असा होता थाट

चार भिंतींच्या आत बंद करूनही सुकेश चंद्रशेखर अगदी मस्त जगत होता. हा खुलासा इतर कोणी नसून त्याची कथित गर्लफ्रेंड जॅकलिन फर्नांडिसने केला आहे. तुरुंगात ठग सुकेश चंद्रशेखरला कशाची कमतरता नसल्याचे अभिनेत्रीने सांगितले. तेथेही त्याला परिधान करण्यासाठी ब्रँडेड कपडे दिले जात होते. इतकेच नाही तर त्याला २४X७ व्हिडिओ कॉलवर उपस्थित राहण्यासाठी सर्व सुविधाही दिल्या जात आहेत.

दिल्लीतील पीएमएलए अधिकार्‍यांना दिलेल्या याचिकेत जॅकलीन म्हणाली, ईडीने माझ्यावर आरोप केले आहेत पण मी मनी लाँड्रिंगमध्ये सुकेशला कधीही पाठिंबा दिला नाही. सुरुवातीला मला सांगण्यात आले की सुकेश मोठा माणूस आहे. जॅकलिन पुढे म्हणते, सुकेश आणि मी अनेकदा व्हिडिओ कॉलवर बोलायचो. यादरम्यान तो नेहमी महागडे कपडे परिधान करताना दिसत होता.

जॅकलिन म्हणते, “एवढेच नाही तर सुकेश रोज वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसायचा. त्याचे सर्व कपडे खूप महाग आणि ब्रँडेड होते. कारागृहाच्या एका कोपऱ्यात उभा राहून सुकेश अनेकदा व्हिडिओ कॉल करायचा. मात्र अनेकदा सिग्नलची समस्या निर्माण झाली. मी त्याला विचारले असता तो म्हणाला की तो नोएडा येथील त्याच्या एका कारखान्यात काम करतो आणि तेथील सिग्नल खूप खराब आहे. जॅकलिन पुढे म्हणते, तो माझ्याशी सकाळ संध्याकाळ बोलत असे. तो 24X7 व्हिडिओ कॉलवरही उपस्थित होता. त्याच्याकडे नेहमी आयफोन आणि आयपॉड असायचा.” जॅकलीनने केलेल्या या खुलाश्यावर सर्वांनाच धक्का बसला आहे.

हेही वाचा – भारताच्या विजयाचा अनन्या आणि आयुष्यमानने अशाप्रकारे घेतला आनंद, मजेशीर व्हिडिओ व्हायरल
केतकी चितळे फेसबूकवर सक्रिय होताच पहिलीच पोस्ट चर्चेत; म्हणाली, ‘निदान आता तरी…’
उर्वशीच्या मनात अजूनही रिषभ पंतसाठी जागा? एक झलक पाहण्यासाठी पोहचली थेट दुबईत 

हे देखील वाचा