Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड सुकेश चंद्रशेखरसोबतचे प्रेमप्रकरण जॅकलिनला पडले चांगलेच भारी, आरोपी म्हणून अभिनेत्रीची ईडी चौकशी चालू

सुकेश चंद्रशेखरसोबतचे प्रेमप्रकरण जॅकलिनला पडले चांगलेच भारी, आरोपी म्हणून अभिनेत्रीची ईडी चौकशी चालू

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (jacqueline fernandez) नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सुकेशसोबत रिलेशनमध्ये आल्यानंतर तिला पैसा अडका तर मिळतोय परंतु या सोबत तिला अनेक अडचणींना देखील सामोरे जावे लागत आहे. आता पुन्हा एकदा तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसचे नाव आरोपी म्हणून ठेवण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुकेश हा गुन्हेगार असल्याची जॅकलिन फर्नांडिसला आधीपासूनच माहिती होती, असा ईडीचा विश्वास आहे. सुकेश हा खंडणीखोर आहे हेही अभिनेत्रीला माहीत होते. यामुळेच ईडीने जॅकलिनवर ताशेरे ओढले आहेत. जॅकलिनला अद्याप अटक सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrashekhar) झालेली नाही. कारण आतापर्यंत न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेतली नसली तरी त्यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

सुकेश चंद्रशेखरवर २१५ कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासात सुकेशने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ईडीने त्याच्यावर कारवाई करत त्याची ७ कोटी रुपयांची संपत्तीही जप्त केली आहे. सुकेश चंद्रशेखरची सहकारी पिंकी इराणी हिने सुकेशला जॅकलीनला भेटायला लावल्याचेही आरोपपत्रात उघड झाले आहे. आणि सुकेश चंद्रशेखरने पिंकी इराणीच्या मदतीने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू आणि रोख रक्कम दिली होती.

ईडी चार्टशीटने असेही उघड केले की सुकेश चंद्रशेखरने डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत जॅकलिन फर्नांडिसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अभिनेत्रीने कॉलला प्रतिसाद दिला नाही. अभिनेत्रीने आरोप केला होता की, सरकारी कार्यालयातील कोणीतरी तिच्याशी संपर्क साधला आणि तिला शेखर रत्न वेला म्हणून ओळखत असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी संपर्क साधण्यास सांगितले.

अभिनेत्रीने पुढे खुलासा केला होता की, जेव्हा तिने सुकेशशी संपर्क साधला तेव्हा त्याने स्वतःची ओळख सन टीव्हीचा मालक म्हणून केली. आपण जयललिता यांच्या राजकीय कुटुंबातील असून त्या चेन्नईच्या असल्याचेही त्यांनी सांगितले. जॅकलीन म्हणाली, सुकेश म्हणाला होता की, तो माझा खूप मोठा चाहता आहे, आणि मी दाक्षिणात्य चित्रपट करावेत आणि सन टीव्हीच्या रूपात त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. तेव्हापासून दोघेही संपर्कात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अंकिताचा बेबी बंप लपला नाही, पती विकी जैन यानेही दिली अशी साथ
‘लोक आमच्या साधेपणाचा फायदा घेत आहेत’ बॉयकॉट बॉलिवूडवर अर्जुन कपूरने सोडले मौन
जास्मिन भसीन प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज, व्यक्त केली उत्सुकता

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा